A big political explosion in Chandrapur : भाजपला बीआरएस पक्षाचे समर्थन, भूषण फुसे यांचा गौप्यस्फोट

A big political explosion in Chandrapur 7 एप्रिलला बीआरएस चे वमशीक्रिष्णा अरकिल्ला यांनी भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना पक्षाच्या वतीने समर्थन पत्र दिले होते, त्याबाबत 10 एप्रिलला बीआरएस पक्षाचे नेते भूषण फुसे यांनी त्या समर्थनाबाबत मोठा खुलासा केला आहे, अरकिल्ला यांना पत्र देण्याचा मुळीच अधिकार नाही, बीआरएस पार्टी कांग्रेस व भाजप विरोधात आहे, अरकिल्ला यांनी कुणालाही विश्वासात न घेता स्वयंम भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला, ही बाब निषेधार्थ असून आम्ही सर्व वमशीक्रिष्णा अरकिल्ला यांचा निषेध करीत आहो अशी माहिती फुसे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

 

अरकिल्ला यांना उमेदवाराला समर्थन देण्याचे कसलेही अधिकार नाही, राज्यातील नेतृत्वाने कुणाला समर्थन द्यायचे याबाबत आदेश दिले नाही, उलट पक्षाचे 5 खासदार भाजपने पळविण्याचे पाप केले आहे. A big political explosion in Chandrapur

 

वमशीक्रिष्णा अरकिल्ला यांचे कृत्य अधिकृत व सुसंगत नसून पक्ष निष्ठेच्या विरोधात आहे त्यामुळे अरकिल्ला यांचा पक्षाच्या वतीने निषेध करीत आहो अशी प्रतिक्रिया फुसे यांनी दिली. A big political explosion in Chandrapur

 

बीआरएस पक्षाने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याने भाजप गोटात आनंदाची लहर होती मात्र फुसे यांच्या गौप्यस्फोटाने भाजप व अरकिल्ला समर्थकांची झोप उडाली आहे.

 

Kcr व बीआरएस पक्षाला मानणाऱ्या नागरिकांनी आपली भूमिका तटस्थ ठेवावी असे आवाहन भूषण फुसे यांनी जनतेला केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!