Aam Aadmi Party Chandrapur चंद्रपूर – आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल केलेल्या तक्रारीनंतर, राजीव गांधी इंजिनिअरिंग महाविद्यालय (RCERT), चंद्रपूरने 4 एप्रिलला काढलेले नोटीस रद्द करून आज 5 एप्रिलला नवीन नोटीस जारी केले आहेत. या नव्या नोटीसमध्ये भारतीय जनता पक्षाचे लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे नाव वगळण्यात आले आहे.
याआधी दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी RCERT कुलगुरू विजय आइंचवार यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात करण्यासाठी स्वत:च्याच संचालित असलेल्या महाविद्यालयात सुधीर मुनगंटीवार यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले होते. परंतु आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या तक्रारीमुळे महाविद्यालयाला हा निर्णय रद्द करावा लागला. म्हणजेच विजय आइंचवारांच्या राजकीय कारकीर्दीच्या पहिल्याच कार्यक्रमावर फेरबदल करावे लागले. म्हणून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवातीलाच “क्लीन बोल्ड” मिळाले. Aam Aadmi Party Chandrapur
या घटनेमुळे आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्षांची भूमिका आणखी बळकट झाली आहे. महाविद्यालयाच्या या पावलामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी नामुष्कीची परिस्थिती निर्माण झाली आहे. Aam Aadmi Party Chandrapur
जिल्ह्यात आम आदमी पार्टी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर येत असल्याचे या घटनेवरून दिसून येते. कॉंग्रेस जरी जिल्ह्यातील मुख्य विरोधी पक्ष असली तरी भाजपाच्या विरोधात आवाज उठविण्याचे काम मागील अनेक वर्षांपासून आम आदमी पार्टीने केल्याचे पाहायला मिळते. Aam Aadmi Party Chandrapur
महाविद्यालयाने कार्यक्रमाच्या आयोजनात बदल करून राजकीय उमेदवाराला निमंत्रित करण्याचा निर्णय रद्द केला आहे. ही घटना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाविरोधातील लोकशाहीच्या लढ्याची एक महत्त्वपूर्ण विजय आहे.
आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले, “आम्ही नियमांच्या राजवटीसाठी आणि निवडणुकीतील अधिकृत प्रक्रियेसाठी लढत आहो. लोकशाहीची शक्ती ही त्या नियमांमध्येच आहे.” Aam Aadmi Party Chandrapur
महाविद्यालयाच्या या पावलामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप टाळण्यास मदत झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जाईल.