AAP officials detained : चंद्रपुरात आप पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

AAP officials detained चंद्रपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेआधी मोदी सरकारकडून आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अनावश्यकरित्या ताब्यात घेण्याची कारवाई सुरू असून जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, ज्येष्ठ नेते सुनिल मुसळे, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, शहर उपाध्यक्ष सुनिल सदाभ्य्यया यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा – एकनाथ शिंदे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

या प्रकारामुळे लोकशाहीची गळचेपी होत असून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे. जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार आणि ज्येष्ठ नेते सुनिल मुसळे यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला असून मोदी सरकारकडून होणाऱ्या या दडपशाहीचा निषेध केला आहे. AAP officials detained

 

आम आदमी पार्टी लोकशाहीची रक्षण करीत राहील आणि नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी लढत राहील. सर्वसामान्य जनतेने या घटनेचा बळी पडणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती आहे. AAP officials detained

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!