Chandrapur Food Poisoning भद्रावती तालुक्यातील माजरी येथे दिनांक 13/04/2024 रोजी काली माता मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
रात्री महाप्रसाद घेतल्यानंतर रात्री लोकांना अन्नातून विषबाधा होऊन उलट्या व जुलाब याचा त्रास होऊ लागला. उपचारासाठी एरिया हॉस्पिटल माजरी येथे दाखल करण्यात आले. तसेच रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय भद्रावती व उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे हलविण्यात आले. Chandrapur Food Poisoning
हे अवश्य वाचा – चंद्रपुरातील तेली समाज म्हणतो आम्हाला बदनाम करू नका, आम्ही कुणाला पाठिंबा दिला नाही
बाधित अन्न खाल्याने 250 लोकांना त्रास जाणवू लागला. प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर काही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे 57 रुग्ण दाखल असून एरिया हॉस्पिटल माजरी येथे 7 रुग्ण ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे 4 रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. Chandrapur Food Poisoning
हे ही वाचा – चंद्रपूर लोकसभेत कांग्रेस व भाजपची परिस्थिती काय? वाचा ही बातमी
विषबाधा झाल्याने 3 रुग्ण अत्यवस्थ झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे वर्ग करण्यात आले.परंतु उपचारादरम्यान गुर्फेक शिवनाथ यादव वय 80 वर्ष यांचा मृत्यू झाला. तर अभिषेक शर्मा वय 5 वर्ष व अनया राजपूत वय 5 वर्ष यांची प्रकृती स्थिर आहे.
पोलिस विभागामार्फत रुग्णांसाठी तत्काळ अँब्युलन्स ची व्यवस्था करण्यात आली. तसेच घटना स्थळी तालुका आरोग्य अधिकारी संजय असुटकर व त्यांची टीम रात्रीपासून हजर राहून बाधित रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यात आले. तसेच आशा वर्कर मार्फत घरोघरी तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच ors वाटप करण्यात आले. व सर्वेक्षण करण्यात आले. सकाळपर्यंत 258 रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. पाणी व अन्नाचे नमुने पुढील तपासणीसाठी FDA ला पाचारण करण्यात आले आहे. Chandrapur Food Poisoning
तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. डॉ. अशोक कटारे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ महादेव इंगोले यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
मा. पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अतिरिक्त पोलिस अधीक्षक रीना जनबंधू यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांनी रुग्णालयात भेट देऊन आढावा घेतला.
सदर घटनेबाबत आयोजक बुल्लुराम दर्शनराम व आचारी छाया तिखट यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माजरी पोलिस स्टेशन चे ठाणेदार सारंग मिराशी करत आहेत.