Chandrapur Lok Sabha Election : चंद्रपूर लोकसभेत कांग्रेस हवेत तर भाजप ग्राउंडवर

Chandrapur lok sabha election पहिल्या टप्प्यातील चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता शेवटचे 3 दिवस उरले आहे, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात कांग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे.

 

भाजप कडून 2 वेळा लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले राज्याचे ताकदवर मंत्री सुधीर मुनगंटीवार तर कांग्रेसतर्फे आमदार प्रतिभा धानोरकर हे एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उभे आहे. Chandrapur lok sabha election

ही बातमी अवश्य वाचा : चंद्रपुरात विषबाधा, एकाचा मृत्यू, आयोजकांवर गुन्हे दाखल

कांग्रेस ची लोकसभेची तिकीट जाहीर झाल्यावर प्रतिभा धानोरकर यांच्या कुणबी समाज उभा झाला होता, मात्र आता शेवटच्या दिवसात भाजपचे पारडे जड झाले आहे.

 

प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा गेमचेंजर ठरली होती मात्र मुनगंटीवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याने भाजप जिल्ह्यात बॅकफुटवर आली. Chandrapur lok sabha election

 

कांग्रेसने त्या वादग्रस्त वक्तव्याचा फायदा घेत आई-बहिणींचा अपमान झाल्याचा कांगावा केला मात्र यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आपलं स्पष्टीकरण देत तो प्रसंग कांग्रेसच्या आणीबाणीच्या काळात घडला असे सांगितले. Chandrapur lok sabha election

 

आपली बाजू आता भक्कम आहे असा भ्रमनिरास कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना सध्या झाला आहे, एकीकडे ग्रामीण भागातील कार्यकर्ते धानोरकर यांच्यावर नाराज होताना दिसत आहे.

 

प्रतिभा धानोरकर मध्ये जनसंपर्काचा मोठया प्रमाणात अभाव आहे, दिवंगत बाळू धानोरकर हयात असताना शुद्ध हिचं परिस्थिती होती आजही ती कायमच आहे. Chandrapur lok sabha election

 

मात्र दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील गावात जनसंपर्क अभियान वाढवीत आहे, भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता थेट मतदारांपर्यंत पोहचत आहे, मात्र कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता यांना वाहनाशिवाय पर्याय नाही, अजूनही त्यांना वाहन प्रचार साहित्य मिळाले नसल्याची चर्चा आहे, ज्या प्रमुख पदाधिकारी यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी दिली ते ढिसाळपणे नियोजन पार पाडत आहे. Chandrapur lok sabha election

 

आपला समाज मोठा आहे व पक्षाचे गठ्ठा मत आपल्याला सहज मिळणार हा अति आत्मविश्वास कांग्रेस पक्षाला जडला आहे, तर दुसरीकडे मुनगंटीवार यांनी सर्व जाती धर्मना सोबत कसे घेता येईल याकडे बारीक लक्ष देत आहे.

 

मुनगंटीवार पालकमंत्री असताना त्यांचे अनेक निर्णय चुकले अनेक प्रकल्प बंद पडले, बाबूपेठ उड्डाणपूल मागील 5 ते 6 वर्षांपासून अर्धवट परिस्थिती मध्ये आहे, प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे, दरवर्षी येणारा पूर, जटपूरा गेट येथील वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते यावर उपाययोजना करण्यात मुनगंटीवार हे सपेशल अपयशी ठरले आहे. Chandrapur lok sabha election

 

दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी मी खासदार बनल्यावर माझ्या पगारातून शेतकऱ्यांचा विमा काढणार अशी घोषणा केली मात्र ती घोषणा हवेतच विरली, त्यांच्या कार्यकाळात एकही विकासकामे झाली नाही, कोरोना काळात चंद्रपूर ते मुंबई रेल्वे बंद झाली ती अजूनही सुरू झाली नाही.

 

आज लोकसभेच्या रणसंग्रामात विद्यमान आमदार यांची टक्कर होत आहे, मात्र कांग्रेस पक्ष हा हवेत काम करीत आहे, घटक पक्ष आम आदमी पार्टी सोडली की दुसरे पक्ष कांग्रेसचा प्रचार करताना दिसत नाही आहे.

 

दुसरीकडे भाजपची सुद्धा हीच परिस्थिती आहे, घटक पक्ष फक्त “राम नाम जपना पराया माल अपना” अशी भूमिका घेऊन आहे.

सुरुवातीच्या काळात कांग्रेस पक्षासोबत असलेले ग्रामीण भागातील नागरिक आता भाजपकडे वळू लागले आहे, एकीकडे अनुभवी व मातब्बर राजकारणी तर दुसरीकडे नवखे राजकारण याचा फरक जनतेला कळू लागला आहे. Chandrapur lok sabha election

 

मात्र एकीकडे महागाई, बेरोजगारी ने त्रस्त जनता आता कांग्रेस शिवाय दुसऱ्या पक्षाला मतदान करू शकतो अशी परिस्थिती सध्या लोकसभा क्षेत्रात निर्माण व्हायला लागली आहे.

 

प्रतिभा धानोरकर यांच्या सभोवताल फिरणारी चौकडी त्यांना नुकसांदायक ठरणार हे नक्कीचं मात्र तोपर्यंत वेळी हातून निघून गेली असणार.

 

एकीकडे महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार प्रत्येक सभा आपल्या सोशल मीडियावर थेट जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या सभा समाजमाध्यमाद्वारे जनतेपर्यंत पोहचत नाही आहे, धानोरकर यांच्या सभा फक्त रिल्स च्या माध्यमातून बाहेर येत आहे पण ग्रामीण भागातील कार्यकर्ते व कास्तकार हे थेट संपर्कात असनाऱ्या उमेदवाराकडे लक्ष देत आहे.

 

 

येणारे 2 दिवस हे भाजप व कांग्रेस साठी “ये राह नही आसान” याकडे इशारा करीत आहे.

तूर्तास इतकेचं

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!