Chandrapur shivsena thackeray चंद्रपूर जिल्ह्यात एकही आमदार किंवा खासदार नसताना सुद्धा युवकांचा कल शिवसेना ठाकरे गटाकडे वाढत आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना नेतृत्वावर विश्वास ठेवत असंख्य युवकांनी पक्षात प्रवेश केला. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवकांचा पक्षप्रवेश प्रस्थापित पक्षांना धक्का मानला जात आहे. Chandrapur shivsena thackeray
हे अवश्य वाचा – तेली समाजाचा आमदार धानोरकर यांना जाहीर पाठिंबा
12 एप्रिलला बल्लारपूर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात चंद्रपूर युवासेना विस्तारक रियाज पटेल, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात बल्लारपूर शहरातील असंख्य युवकांनी हाती शिवबंधन बांधले. Chandrapur shivsena thackeray
गोरगरिबांचे काम कसे होणार याकडे सर्वांनी लक्ष देत पक्षवाढी कडे युवकांनी लक्ष द्यावे असा संदेश संदीप गिर्हे यांनी दिला. Chandrapur shivsena thackeray
आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, महिला जिल्हा संघटिका कल्पना गोरघाटे बल्लारपूर तालुका प्रमुख नीरज यादव, शहर प्रमुख अनिकेत बेलखोडे, सागर राऊत, बाबा साहू, प्रशांत मेश्राम व सोनू श्रीवास यांची उपस्थिती होती.