Chief Minister’s Aid Fund : आमदार किशोर जोरगेवार मुळे त्या रुग्णाला मिळाली मदत

Chief Minister’s Aid Fund मेंदु रोग आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाला उपचाराकरीता आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नामुळे मुख्यमंत्री सहायता निधी मधून 1 लक्ष रुपयांची मदत करण्यात आली आहे. या निधीतून आता  समीर खाँ रहीमतुल्ला खाँ पठान या रुग्णावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार केला जाणार आहे.

 

समीर खाँ रहीमतुल्ला खाँ पठान या 52 वर्षीय व्यक्तीला मेंदूच्या आजाराने ग्रासले होते. परिस्थिती हलाकीची असल्याने योग्य उपचार करणे त्यांच्याने शक्य होत नव्हते. आजवर अनेक ठिकाणी उपचार घेतला मात्र पैश्याअभावी त्यांच्यावर पूर्ण उपचार होऊ शकले नाही. Chief Minister’s Aid Fund

 

परिणामी त्यांच्या वेदना त्रासदायक होऊ लागल्या. अश्यात त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आरोग्य सेवकांच्या वतीने त्यांना सदर आजारावरील उपचारा बाबत माहिती देण्यात आली. Chief Minister’s Aid Fund

 

तसेच यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतुन मदत मिळवून देण्याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांना कळविण्यात आले. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी पाठपूरावा करत सदर रुग्णाला उपचारा करिता मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख रुपयांना निधी मिळवून दिला आहे. सदर निधीतुन आता या रुग्णावर नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार केल्या जात असुन त्यांच्यावर क्रॅनियोप्लास्टी शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!