Code of conduct violation : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात पहिली कारवाई

Code of conduct violation पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीची सुरुवात झाली आहे, या रणधुमाळीत प्रत्येक हालचालीवर प्रशासनाची बारीक नजर आहे, निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.

हे अवश्य वाचा : शॉर्टस रिल्स बनवा आणि जिंका हजारोची बक्षिसे, चंद्रपुरात सुरू झाली स्पर्धा

एकीकडे चंद्रपूर जिल्हा प्रशासन आचारसंहितेबाबत नागरिकांना जागृत करीत आहे तर दुसरीकडे शासकीय कर्मचाऱ्याने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा प्रकार चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील आर्णी विधानसभा क्षेत्रात उघडकीस आला आहे. Code of conduct violation

हे ही अवश्य वाचा : चंद्रपूर शहरात एक दिवस आड होतो विकास, बघा हे भयावह वास्तव्य

या प्रकरणी सहायक निवडणूक अधिकारी सुहास गाडे यांनी कारवाई करण्याचे वनविभागाला निर्देश देत तात्काळ कारवाईचा अहवाल सादर करण्याबाबत आदेश काढला, वनविभागाने सदर प्रकरणात वनविभाग पांढरकवडा येथील वाईल्डलाईफ विभागात कार्यरत क्लर्क ला निलंबित करण्यात आले. Code of conduct violation

 

विभागीय वन अधिकारी, वन्यजीव कार्यालय येथे वाईल्डलाईफ मध्ये अधिनस्त कर्मचारी शिवशंकर मोरे यांनी व्हाट्सएप स्टेटस वर EVM बाबत संशय घेणे, ये सच्चाई है, असे स्टेटस ठेवले ज्यामुळे खोट्या माहितीचा प्रचार करणे व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणे, व इतर पक्ष किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर आंधळेपणाने केलेले आरोप आणि विपर्यास माहितीच्या आधारे टीका टिप्पणी करण्यात आल्याचे उक्त स्टेटस वर आढळून आले, याबाबत सुजाण नागरिकाने मोरे यांच्या विरुद्ध आचारसंहिता उल्लंघणाची तक्रार देत व्हिडीओ सादर केले. Code of conduct violation

हे ही वाचा : मुनगंटीवार यांच्यावर घाणेरडी टीका?

शिवशंकर मोरे हे स्वतः शासकीय कर्मचारी असून त्यांच्याकडून अश्याप्रकारचे वर्तन अशोभनीय आहे, करीता मोरेवर लोकप्रतिनिधींत्व कलम 1951 चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर विभागीय वन अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करीत तसा अहवाल सहायक निवडणूक अधिकारी चंद्रपूर लोकसभा क्षेत्र यांच्या कार्यालयात सादर करण्याचे आदेश सुहास गाडे यांनी दिले होते, निवडणूक काळात वनविभागातील कर्मचाऱ्याने आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याने तात्काळ मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!