Complaint of code of conduct violation : चंद्रपुरात आदर्श आचारसंहितेचा फज्जा, आप ची तक्रार

Complaint of code of conduct violation चंद्रपूर – पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्याकडे जात असून सध्या विविध नागरिक उमेदवारांच्या समर्थनार्थ पक्षात प्रवेश घेत आहे.

 

गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.विजय आईनचवार व राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण पोटदुखे यांनी नुकताच भाजप पक्षात प्रवेश केला, प्रवेश केल्यावर आपण आता महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना मदत करायला हवी हा विचार मनात घेऊन त्यांनी चक्क महाविद्यालयात उमेदवार मुनगंटीवार यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलाविले. Complaint of code of conduct violation

 

याबाबत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांना आचारसंहिता उल्लंघन बाबत तक्रार केली आहे.

5 एप्रिलला राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात क्रीडा सप्ताह तरंग 2024 कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, आणि या कार्यक्रमात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलाविले आहे. Complaint of code of conduct violation

 

याबाबत महाविद्यालय प्रशासनाने नोटीस सुद्धा जारी केले आहे, या कार्यक्रमात मुनगंटीवार यांना बोलावणे म्हणजे सरळ आचारसंहितेचे उल्लंघन असल्याची बाब मयूर राईकवार यांनी म्हटले आहे.

हे अवश्य वाचा : हवामान खात्याने दिला इशारा, चंद्रपुरात येणार उष्णतेची लाट, सतर्क रहा

तक्रारीनुसार, शासकीय निधी प्राप्त केलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये निवडणुकीच्या काळात राजकीय कार्यक्रम आयोजित करणे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरते. त्यामुळे या बैठकीच्या आयोजकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी मयूर राईकवार यांनी केली आहे. Complaint of code of conduct violation

क्रीडा सप्ताह “ तरंग 2024” या शिर्षकाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रमाचे नोटीस संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य Dr.प्रवीण पोटदुखे यांनी जारी केले असून सदर कार्यक्रमात नुकतेच BJP पक्षात प्रवेश घेतलेले माजी कुलगुरू Dr.विजय आईंचवार, अध्यक्ष SPMS ट्रस्ट तसेच बीजेपी व इतर NDA घटक लोकसभा दल उम्मीदवार सुधीर मुनगंटीवार यानी सदर कार्यक्रमात विध्यार्थ्यांना संबोधित करणार आहे. Complaint of code of conduct violation

 

सदर महाविद्यालय UGC, महाराष्ट्र शासन व इतर शासकीय यंत्रणे मार्फत अनुदान व निधी संकलन करत असते या व्यतिरिक्त सदर महाविद्यालयाचे कर्मचारी वृंद व शिक्षकांना सुद्धा सरकार कडून वेतन मिळते अश्या स्थितीत सदर महाविद्यालय निवडणुकीच्या वेळी प्रचार करण्यासाठी वापरता येत नाही.

या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीत संबंधित महाविद्यालयाचे कर्मचारी वृंद तसेच शिक्षकांना निवडणूक कर्तव्यासाठी सुद्धा नियुक्त करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

भारतीय लोकतंत्र मध्ये निवडणूक हा मोठा समारंभ व देशातील सामान्य नागरिकांचे मताचे आधारे आपल्या प्रतिनिधीना निष्पक्ष व आदर्श आचार संहितेचा कठोरतेने पालन करूनच निवडणुकीत सहभाग होण्याचा तसेच निवडणूक आयोगाचा परम कर्तव्य असतो परंतु संबंधित उम्मेद्वार व त्यांची निवडणूक पद्धत नियमबाह्य दिसून येत आहेत. Complaint of code of conduct violation

हे अवश्य वाचा : EVM मशीन बाबत शासकीय कर्मचाऱ्याने केला अपप्रचार, प्रशासनाने केले निलंबित, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात आचारसंहिता उल्लंघणाची कारवाई

शासना कडून अनुदान प्राप्त महाविद्यालय, शिक्षण संस्थान तसेच इतर संस्थेत कोणतेही प्रचार कार्यक्रम किंवा निवडणुकीचा दर्मियान बैठक घेता येत नसताना बी जे पी व इतर NDA घटक दल उम्मीदवार याची बैठक नियमबाह्य रीत्या आयोजित करण्यात येत आहे करीता संबंधित आयोजक समिती तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे अध्यक्ष विरुद्ध आदर्श आचार संहिता चे उल्लंघन बाबत कार्यवाही करण्यासाठी राईकवार यांनी सदर तक्रार मुख्य निवडणूक आयुक्त यांना 5 एप्रिलला केली आहे. राईकवार यांच्या तक्रारींवर निवडणूक आयुक्त काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!