Dr. Ambedkar Jayanti 14 एप्रिलला चंद्रपुरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या भारतरत्न बाबासाहेबांच्या पुतळ्याला अनुयायांनी अभिवादन केले.
शहरातील इंदिरा नगर येथे युवासेना व भीमरत्न युवा बहुउद्देशीय संस्थेद्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. Dr. Ambedkar Jayanti
भोजनदान कार्यक्रमाचा इंदिरा नगर परिसरातील नागरिक व भीम अनुयायांनी लाभ घेतला.
आयोजित भोजनदान कार्यक्रमात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, रविकांत टेम्भुरकर, प्रफुल उईके, सुमित दोडके, सुशील उईके, अनिकेत भरणे, आशिष चंदनखेडे, अनुराग गजघाटे, प्रेमकांत चौरे व गजानन राऊत यांची उपस्थिती होती. Dr. Ambedkar Jayanti