Eknath Shinde joins Shiv Sena Thackeray faction : एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश

Eknath Shinde joins Shiv Sena Thackeray faction लोकसभा निवडणुकीची रंगतदार लढत आता सुरु झाली आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातून इनकमिंग, आऊटगोइंग चे सत्र सुरु झालंय.अशात नुकतीच एक मोठी बातमी हाती आली आहे.एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर रित्या प्रवेश केलाय.तुम्हालाही धक्का बसेल पण हि बातमी खरी आहे.

 

शिंदे यांनी महाराष्ट्र तेलंगणा सीमावर्ती भागातील घाटकुळ येथे एका अतिशय सामान्य कार्यक्रमात शिवसेना उबाठात प्रवेश करीत अनेकांना मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर आता एकच एक चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. उबाठात प्रवेश करणारे एकनाथ शिंदे हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नसून ते चंद्रपूरातील घाटकुळ या गावातील रहिवासी आहेत. Eknath Shinde joins Shiv Sena Thackeray faction

Shivsena breaking
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा प्रवेश करताना

बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर सैनिक असलेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली. अनेक आमदाराना हाताशी घेत त्यांनी भाजपशी हातमिळविनी केली. भाजपने त्यांना “रिटर्न गिफ्ट”दिलय. शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता.यानंतर राज्यात खोके, गद्दार, मिंधे अशा विविध उपमांच राजकारण सुरु झालं. शिवसेनेचे धनुष्यबान चिन्ह गेलं.आमदार गेले, चिन्हही गेलं. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेन आता चांगलाच बदला घेतला आहे. Eknath Shinde joins Shiv Sena Thackeray faction

 

होय 7 एप्रिलला रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांचा उबाठात सार्वजनिक रित्या प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. चंद्रपूरातील पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ यां गावात हा कार्यक्रम संपन्न झाला. पण उबाठात प्रवेश घेणारे हे एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री नसून ते घाटकुळ येथील रहिवासी आहेत. Eknath Shinde joins Shiv Sena Thackeray faction

 

एकनाथ रावजी शिंदे असे त्यांचे पूर्ण नाव आहे आज यां एकनाथ शिंदे यांनी आपल्या अनेक समर्थकांसह शिवसेना उबाठात प्रवेश घेतला. या शिंदेच्या प्रवेशाची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे,यांच्या उपस्थित व तालुका प्रमुख आशिष कावटवार शिवसेना गोंडपिपरी तालुका प्रमुख सुरज माडुरवार,संदीप सुमटकर, झाडे, पालं यांच्यासह अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. शेकडो युवकांनी प्रवेश घेतला.

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!