Election campaign vehicle : त्या सरपंचावर गुन्हा दाखल

Election campaign vehicle चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील आर्णी विधानसभा क्षेत्रातील बारभाई या गावात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार वाहनाला सरपंच प्रदीप जाधव यांनी बाहेरचा रस्ता दाखविला, याबाबत समाजमाध्यमावर व्हिडीओ सुद्धा व्हायरल करण्यात आला होता.

हे अवश्य वाचा : नितीन गडकरी यांच्या तोंडून निघालं शिलाजीत चा उल्लेख, आणि मग हश्या पिकला

सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार वाहनाला बाहेरचा रस्ता दाखविणे सरपंच जाधव यांना महागात पडले आहे, कारण वाहन चालक ज्ञानेश्वर जाधव यांनी पारवा पोलीस स्टेशनमध्ये सरपंच जाधव विरोधात तक्रार दाखल केली. Election campaign vehicle

 

व्हिडीओ मध्ये नेमकं काय?

भाजपने आमच्या खात्यात 15 लाख रुपये अजून टाकलेले नाही, महागाई वाढवली, 400 रुपयांचा सिलेंडर आज अकराशे रुपयांपर्यंत गेला आहे, कास्तकारांच्या समस्येवर काही निराकरण नाही, त्यामुळे हा प्रचार वाहन आमच्या गावात नको असे बोल सरपंच जाधव यांनी वाहन चालकाला सुनावले होते.

 

त्यामुळे वाहन चालक ज्ञानेश्वर जाधव यांच्या फिर्यादीवरून पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावळी पोलीस दूरक्षेत्र इंथे कलम 500,504,506,34 IPS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. Election campaign vehicle

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!