Mul City Bus Station : मूल बस स्थानकावर प्रवाशांचे हाल बेहाल

गुरू गुरनुले

Mul City Bus Station मुल – स्वच्छ सुदंर शहर म्हणून ओळख असलेल्या मुल शहरात कोटी रुपये खर्च करुन बसस्थानक बांधण्यात आले. तरी देखील अन्य सोई सुविधा, कर्मचाऱ्यांची कर्तव्यात कुचराई मात्र अजूनही कायम असल्याने रात्रीच्या वेळेला प्रवाशी बांधव महिला व शाळेच्या विद्यार्थ्यांचे बेहाल होत असल्याचे अडून राहिलेल्या ग्रामीण प्रवाशी बांधवांनी बोलून दाखविले आहे.

 

दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी रात्री ८-३० वाजता गोंडपीपरी मार्गाकडे जाणारी बस रात्री ८ वाजता यायला पाहिजे परंतु ती बस रात्री ९-४० नंतर आल्याने तोपर्यंत शाळेचे विद्यार्थी व लग्नकार्यालां आलेले जूनासूर्ला,व त्यामार्गावरील असंख्य प्रवासी बसस्थानकावर अडून पडल्याने बिचाऱ्या प्रवाशी बांधवांचे बेहाल झाल्याचे प्रवाशी बांधवांनी बोलून दाखविले आहे. Mul City Bus Station

Rte – RTE चे नवे नियम पालकांना त्रासदायक

वाहतूक नियंत्रक गायब

मुल हे मध्यवर्ती बसस्थानक असल्याने याठिकाणी वाहतूक नियंत्रक यांची ड्युटी सकाळी ५ ते दुपारी १४ नंतर दुपारी १४ ते रात्री २२(१०) पर्यंत असल्या नंतरही ज्या कुणाची ड्युटी आहे तो वाहतूक नियंत्रक रात्री ८ वाजताच घरी निघून जात आहे. त्यामुळे बसस्थानकावर असणाऱ्या प्रवाशांनी कुणाकडून बसची चौकशी करावी असा प्रश्न प्रवाशांना पडला. Mul City Bus Station

 

चंद्रपूर – गडचिरोली मार्गाच्या बसेस रात्री १० वाजेपर्यंत येतात तेव्हा स्थानकावर कोणीही जबाबदार व्यक्ती दिसून येत नाही ही वस्तुस्थिती आहे. मग स्थांनकावरची वाहतूक व्यवस्था कोण पाहणार.? असा प्रश्न पडतो. Mul City Bus Station

 

विभागीय नियंत्रक व आगार व्यवस्थापकांनी लक्ष द्यावे

मुल शहरातील नगराच्या मध्यभागी असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची,ग्रामीण नागरिकांची किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांची तक्रार असतेच. मुल येथील बसस्थानकावर प्रवाशी वाहतुकीबाबत चंद्रपूर जिल्हा विभागीय नियंत्रकांना दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. तसेच आगार व्यवस्थापकांनी सुद्धा मूलच्या बसस्थानका कडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!