A new trick to steal money एटीएम ला सिल्व्हर रंगांची पट्टी लावत पैसे चोरणाऱ्या टोळीला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे, आरोपीमध्ये 2 विधिसंघर्ष बालक व आरोपी कार्तिक मामीडवार यांचा सहभाग आहे.
13 एप्रिलला लता तिवारी ह्या रामनगर सिंधी कॉलोनी जवळील Canara बँकेच्या ATM मध्ये पैसे काढण्याकरिता गेल्या होत्या, त्यावेळी कुणीतरी अज्ञाताने लक्ष विचलित करीत एटीएम मध्ये सिल्व्हर रंगांची पट्टी लावत 5 हजार रुपये चोरून नेले. A new trick to steal money
ही बातमी अवश्य वाचा : लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा वचननामा बघितला काय?
याबाबत तिवारी यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, तक्रारीची दखल घेत पोलिसांनी कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल केला, त्यानंतर पोलीस कर्मचारी यांनी तपास सुरू केला असता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून व तांत्रिक पध्दतीने तपास केल्यावर आरोपी 27 वर्षीय कार्तिक शंकर मामीडवार राहणार लालपेठ कॉलोरी, बाबूपेठ रेल्वे स्टेशन जवळ व दोन विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले. A new trick to steal money
आरोपीची विचारपूस केली असता त्यांनी चंद्रपूर शहरात अंदाजे 5 ते 7 ठिकाणी एटीएम मशीनमध्ये सिल्व्हर रंगांची पट्टी लावत पैसे चोरी करण्याचा प्रयत्न सहित बल्लारपूर पेपर मिल समोरील एटीएम मधून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली. A new trick to steal money
ही बातमी अवश्य वाचा – चंद्रपूर लोकसभेची नेमकी परिस्थिती काय आहे?
आरोपिकडून फिर्यादीचे 5 हजार रुपये जप्त करण्यात आले, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु व पोलीस उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गाडे व गुन्हे शोध पथक यांनी केली.
नागरिकांसाठी रामनगर पोलिसांची सूचना….
एटीएम मशीन मधील पैसे निघण्याच्या ठिकाणी सिल्व्हर रंगांची पट्टी लावून पैसे अडकल्याचे भासवून थोड्या वेळानी सिल्व्हर रंगांची पट्टी काढून पैसे चोरी करणारी टोळी सक्रिय झाली असल्याने शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क रहावे.