Nitin gadkari speech in chandrapur पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे, 6 एप्रिलला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
हे अवश्य वाचा – चंद्रपुरात मतदानाची साखळी
आयोजित सभेत नितीन गडकरी यांनी जुन्या आठवणीना उजाळा देत भाजपच्या स्थापना दिवस व मुनगंटीवार यांच्यासोबत मंत्रिमंडळात केलेल्या कामाची माहिती दिली, जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम मुनगंटीवार हे करीत आहे, एडवांटेज चंद्रपूर च्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळेल ही संकल्पना मुनगंटीवार यांची आहे, आम्ही चंद्रपूर जिल्ह्याला 474 किलोमीटर चे राष्ट्रीय महामार्ग दिले, 10 हजार कोटींचा निधी सुद्धा उपलब्ध करून दिला. Nitin gadkari speech in chandrapur
हे अवश्य वाचा – ऐन उन्हाळ्यात चंद्रपुरात पाण्याची समस्या
देशात मागील अनेक वर्षांपासून माणूस माणसाला खेचत होता आमचं सरकार आल्यावर आम्ही ई रिक्षा बाजारात आणला त्यामुळे देशात सामाजिक क्रांती आली. Nitin gadkari speech in chandrapur
आपण सर्व सुज्ञ आहात, जातीपातीचे राजकारण करू नका, कारण जो गॅस सिलेंडर हिंदूंना ज्या दरात मिळतो त्या दरात तो मुस्लिम बांधवनाही मिळतो, पुढील 5 वर्षात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दोन लाख कोटींची गुंतवणूक होणार अशी माहिती गडकरी यांनी दिली.
मात्र भाषणाच्या शेवटच्या वाक्यात गडकरी हडबडले, ते म्हणाले की सुधीर मुनगंटीवार यांना तुम्ही लोकसभेत पाठविले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मी स्वतः राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार त्यांच्या ताकदीने पाठीशी राहणार, आम्ही त्यांना पॉवरफुल शिलाजीत देऊ, असे म्हटल्यावर गडकरी यांना आपण कुठे चुकलो तर नाही याचा प्रत्यय त्यांना येताच ते म्हणाले शिलाजीत म्हणजे विकासकामांसाठी देऊ, कारण मी फोकनाड्या माणूस नाही जे म्हणतो ते मी करतो, कुणी पत्रकार मला प्रश्न विचारू शकत नाही. Nitin gadkari speech in chandrapur
सध्या भर दुपारी सभा होत असल्याने अतिउष्ण जिल्ह्यातील नागरिक सभेला जाणे टाळत आहे, फक्त कार्यकर्ते या सभेला उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात रस्ते बनले मात्र बायपास मार्गाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते, त्यावर नितीन गडकरी यांनी बोलण्याचे टाळले.