No Parking Zone : चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षकांचा नवा आदेश

No Parking Zone पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 8 एप्रिलला चंद्रपुरात दाखल होत आहे.

 

महायुतिचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी हे मोरवा येथे सभा घेणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आगमननिमित्त पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. No Parking Zone

हे ही वाचा : जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा नवा आदेश

आयोजित सभेकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33-1 ब नुसार सार्वजनिक ठिकाणी रहदारी सुरळीत राहत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवत जनतेला त्रास होऊ नये यासाठी 7 एप्रिल दुपारी 2 वाजता ते 8 एप्रिल चे रात्री 8 वाजेपर्यंत मोरवा विमानतळ पासून मोरवा टी-पॉईंट, पडोली चौक ते वरोरा नाकापर्यंत तसेच मोरवा टी पॉईंट ते साखरवाही फाटा हे दोन्ही मार्ग नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. No Parking Zone

 

या दोन्ही मार्गावर नागरिकांनी आपली वाहने पार्क करू नये व मार्गावर कुणी दुकाने हात ठेले लावू नये याबाबत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आदेश निर्गमित केला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!