Prachar Sabha Pratibha Dhanorkar : प्रतिभा धानोरकर यांच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद

Prachar Sabha Pratibha Dhanorkar चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील अनेक गावात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या सभा होत आहे. बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गावात आज ( गुरुवार ) सभा झाली. धानोरकरांच्या या सभेला प्रचंड प्रतिसाद लाभला. कोठारी परिसरातील अनेक गावातील जनता, कार्यकर्ते, समर्थकांनी सभेला मोठी गर्दी केली होती.

हे ही वाचा – चंद्रपुरात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील कोठारी येथे आज दौरा केला. यावेळी धानोरकर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. प्रतिभा धानोरकर यांनी जनतेशी जिव्हाळयाने संवाद साधला. त्यानंतर कोठारी येथे सभा झाली. Prachar Sabha Pratibha Dhanorkar

हे ही वाचा – विविध सामाजिक संघटनांचा मुनगंटीवार यांना पाठिंबा

आमदार सुधाकर अडबाले, संदिप गिर्हे शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), घनश्याम मुलचंदानी (काँग्रेस नेते), दिलीप चौधरी(संभाजी ब्रिगेड) , प्रकाश पाटील मारकवार, गोविंदा उपरे (बल्लारपूर तालुका अध्यक्ष, कॉंग्रेस), संतोष इटनकर, सुरेश चहारे, मिंटू गेडाम, संजय खोडीलकर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विलास राजूरकर यांनी केले. Prachar Sabha Pratibha Dhanorkar

 

इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( शरदचंद्र पवार गट), द्रमूक, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुकूमशाही विरोधातील ही लढाई आहे. देश्यातील उद्योगपतींच्या हिताचे निर्णय केंद्रातील सरकारने घेतले. मात्र देश्यातील तरुणांचा पुढे रोजगाराची मोठी समस्या उभी आहे. महागाईमुळे सामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. हे प्रश्न सरकारला महत्वाचे वाटू नये, ही मोठी शोकांतिका आहे,असे धानोरकर म्हणाल्या.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!