Prakash ambedkar on narendra modi : पंतप्रधान मोदी गल्लीतला दादा – प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar on narendra modi लोकसभेच्या रणधुमाळी मध्ये 11 एप्रिलला रात्री 9 वाजता वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन सभा पार पडली, या सभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती.

Vanchit bahujan aghadi chandrapur

चंद्रपूर लोकसभा उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 

आयोजित सभेत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत मोदी हे पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी लायक माणूस नाही, कारण मोदी हे गल्लीतल्या दादासारखं वागत आहे, गल्लीतला दादा हा त्या वस्तीत असणाऱ्या दुकानदारांकडून हफ्ता वसूल करतो मात्र नरेंद्र मोदी त्या दादासारखं देशपातळीवर ईडी चा वापर करून हफ्ता वसूल करण्याचे काम करतो, ज्यांच्याकडून मोदी यांना पैसे घ्यायचे असतात त्यावेळी त्या कंपनीला ईडीची नोटीस दिल्या जाते, पैसे दिल्यावर मात्र चौकशी पूर्णतः थांबविण्यात येते, असाच प्रकार गल्लीतला दादा करतो. याला आपण आज इलेक्टरोल बॉण्ड म्हणतो. Prakash ambedkar on narendra modi

 

मला कांग्रेस पक्षासोबत युती करायची होती मात्र ती काही कारणास्तव झाली नाही, देशात मोदी बॅकफूटवर आहे, त्यांच्याविरोधात अनेक मुद्दे आहे, ते मुद्दे आपण जनतेसमोर घेऊन जाऊ असं मी कांग्रेसला सांगितले मात्र ते काही तयार नव्हते. जेव्हा देशात घटना अस्तित्वात आली त्यावेळी त्या घटनेला सर्वात जास्त विरोध भाजप व आरएसएस ने केला होता, मोदी शाळेत न गेल्याने त्यांना इतिहास माहिती नाही. Prakash ambedkar on narendra modi

 

आज पंतप्रधान मोदी हे आपली गॅरंटी देत आहे मात्र जो स्वतः आपल्या पत्नीला गॅरंटी देऊ शकत नाही ते देशाला कसली गॅरंटी देणार, लक्षात ठेवा मोदी हा खोटारडा माणूस आहे.

सत्ता परिवर्तन सभेत नागरिकांची हजारोंच्या संख्येत उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!