Railway Tickets Booking Scam : चंद्रपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

Railway Tickets Booking Scam उन्हाळ्याच्या सुट्ट्या व लग्न समारंभात जाण्यासाठी सध्या नागरिक मोठ्या प्रमाणात गावी जातात, प्रवास सुखकर व्हावा यासाठी नागरिक रेल्वेचा वापर करतात मात्र तिथेही प्रवाश्यांना वेळेवर तिकीट मिळत नाही, याचं मुख्य कारण म्हणजे ई-तिकीट काढणारे एजंट, मोठ्या कमिशन च्या नादात रेल्वे तिकीट आधीच आरक्षित करण्यात येते, त्यामुळे नागरिकांना तिकीट मिळत नाही, याबाबत चंद्रपूर व नागपूर रेल्वे पोलिसांना तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

 

ही बातमी अवश्य वाचा : चंद्रपुरातील इको प्रो संस्थेची बदनामी

नागपूर RPF चे आयुक्त मनोज कुमार यांनी यावर कारवाई करण्याचे निर्देश चंद्रपूर रेल्वे पोलिसांना दिले होते.
चंद्रपूर हद्दीतील एजंट वर रेल्वे पोलिसांनी आधी त्यांच्यावर नजर ठेवली व 20 एप्रिलला 5 पथक तयार करीत एकाच वेळी छापामार कारवाई केली. Railway Tickets Booking Scam

ही बातमी आपल्यासाठी – नियम बदलला, अनेक पालकांचे स्वप्न भंगले

यावेळी चंद्रपूर येथील 5, घुग्गुस येथील 5, वणी 2, भद्रावती आणि माजरी येथे प्रत्येकी 1 एजंटला अटक करण्यात आली.

 

14 एजंट कडून 61 तिकीट किंमत 1 लाख 32 हजार 47 रुपये जप्त केले त्यासोबत उपभोग केलेले एकूण 210 तिकीट असा एकूण 271 तिकीट मिळून तब्बल 5 लाख 10 हजार 481 रुपये किमतीचे तिकीट जप्त करीत रेल्वे कायद्यानुसार एजंटला अटक करीत कारवाई करण्यात आली. Railway Tickets Booking Scam

 

 

सदरची कारवाई रेल्वे पोलीस के.एन.राय, आर के यादव, हरवंश सिंह, प्रियांका सिंह, सचिन नागपूरे यांनी केली, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी 21 एप्रिलला सायंकाळी 7 वाजता दिली.

 

चंद्रपूर जिल्ह्यात याआधी सुद्धा असे प्रकरण उघडकीस आले होते, मात्र त्यानंतर सुद्धा रेल्वे तिकिटांची काळाबाजारी सुरूच आहे, यामध्ये विशेषतः टूर्स अँड ट्रॅव्हल्स, सायबर कॅफे मध्ये तिकिटांची वेगवेगळ्या खात्याद्वारे खरेदी विक्री होते. Railway Tickets Booking Scam

 

मात्र प्रशासन सुद्धा यावर आजपर्यंत पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकले नाही, नागरिकांच्या तक्रारी गेल्यावर प्रशासनाला जाग येते मात्र तोपर्यंत हजारो नागरिकांचे खिसे एजंट खाली करून बसलेले असतात.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!