Sharad Pawar Ncp : राजेंद्र वैद्य यांनी दिला अजित पवार गटाला जोरदार धक्का

Sharad pawar ncp चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी(शरद पवार) चे संघर्सयोद्धा आणि युवकांचे लोकप्रिय नेतृत्व आ. रोहीतदादा पवार आणि आ.सुनील भुसारा तसेच युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांच्या मुख्य उपस्थितीत जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यंच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवित शाहरुख शेख आणि शहर अध्यक्ष रियाजभाई शेख यांच्या नेतृत्वात NCP अजित पवार यांची साथ सोडत पुन्हा NCP शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात घरवपासी करण्याचा निर्णय घेतला.

 

शाहरुख शेख तसेच रियाजभाई व त्यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय मुल येथे आ. रोहितदादा पवार यांनी पक्षात प्रवेश दिला.या पक्षप्रवेश कार्यक्रम प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,महीला जिल्हाध्यक्ष सू.बेबीताई उईके,युवक जिल्हाध्यक्ष श्री.सुमित समर्थ,ज्येष्ठ नेते प्रदेश सरचिटणीस श्री हिराचंद बोरकुटे,नागभीड तालुकाध्यक्ष डॉ.रघुनाथ बोरकर, मुल शहर अध्यक्ष श्री.महेश जेंगठे,महीला तालुका अध्यक्ष निता गेडाम,शहर महीला अध्यक्षा सौ.अर्चनाताई चावरे,श्री.भरतकर,श्री.निपचंद शेरकी गुरुजी, सिंदेवाही तालुका अध्यक्ष इब्राहिम शेख,शहर अध्यक्ष श्री.कुळमेथे,श्री.मनोज सैनी इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. Sharad pawar ncp

 

या प्रसंगी शाहरुख शेख यांची नागभिड तालुका NCP कार्याध्यक्ष पदावर तर श्री.श्रावण धारणे यांची नागभीड शहर NCP अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. आजच्या या कार्यक्रमात नागभिड तालुक्यातून राष्ट्रवादी ( अजित पवार) गटात गेलेले जवळपास ९५% कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) यात प्रवेश करून घरवापसी केली.सर्व नाव नियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत आ.रोहित पवार आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी केले. Sharad pawar ncp

 

हिंगणघाट विधानसभेसाठी समनव्यक म्हणून राजेंद्र वैद्य यांची नियुक्ती

 

वर्धा लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी-राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) चे अधिकृत उमेदवार श्री.अमर काळे यांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) + काँग्रेस + शिवसेना + AAP + समाजवादी पार्टी व इतर घटक पक्षांतर्गत समन्वय साधून हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात श्री.अमर काळे यांच्या प्रचारात सर्व घटक पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक करून त्यांच्या अडचणी जाणून घेवून त्या दूर करून आपसात ताळमेळ घडवून आणून सर्वांना जोमाने निवणुकीच्या प्रचारार्थ लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरदचंद्र पवार) तर्फे हिंगणघाट विधानसभा समन्वयक म्हणून चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांची नियुक्ती विदर्भाचे पक्षाचे प्रभारी आ.अनीलबाबु देशमुख यांनी प्रांताध्यक्ष आ.श्री.जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार केली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!