Shivsena thackeray chandrapur पहिल्या टप्प्यात होणाऱ्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, मात्र या रणधुमाळी मध्ये शिवसेना ठाकरे गटाने भाजपला जोरदार धक्का दिला आहे.
हे ही वाचा – धृतराष्ट्र सांगणार चंद्रपुरात इतकी विकासकामे
चंद्रपूरातील निंबाळा गावातील भाजपचे सरपंच सौरभ संतोष दुपारे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व जिल्ह्यातील नेतृत्व संदीप गिर्हे यांच्या कार्यावर विश्वास ठेवत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. Shivsena thackeray chandrapur
जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी सरपंच दुपारे यांचं पक्षात स्वागत करीत पक्ष वाढीसाठी जोमात कार्य करावे अश्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी गावातील नागरिक व युवासेनेचे विनय धोबे उपस्थित होते.