Sudhir mungantiwar bjp चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संघटना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा महाविकास आघाडीचे उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा देत आहेत. महिला पतंजलि योग समिती महाराष्ट्र, पालेवार भोई समाज चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा साऊन्ड सिस्टम असोशिएशन चंद्रपूर, राष्ट्रीय हिन्दू महासभा (भारत), राष्ट्रीय संघर्ष समिती ईपीएस ९५ चंद्रपूर जिल्हा, सोनार समाज चंद्रपूर जिल्हा,विश्वब्राम्हण पांचाळ सेवा समिती जिल्हा चंद्रपूर यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांना निवडून देण्याचा संकल्प हाती घेतला आहे. सुधीरभाऊंसारखा आपल्या हक्काचा उमेदवार निवडून यावा यासाठी अनेक संघटना सरसावल्या आहेत.
चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रात आता निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. हुकूमशाही विरुद्ध लोकशाही, माफियाराज विरुद्ध गुंडाराज असं चित्र यावेळी पाहायला मिळत असून सुधीर भाऊंची बाजू भक्कम दिसत आहे. ना. मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेत, मंत्री राहिलेत, त्यामधून त्यांनी केलेली अनेक विकासकामे ही त्यांची जमेची बाजू आहे.ते सलग निवडून येत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव मतदारसंघात आहे. Sudhir mungantiwar bjp
हे ही वाचा – सुधीर मुनगंटीवार करणार सायबर क्राईम मध्ये तक्रार
विमानतळ, वेकोलीचे भूमिअधिग्रहण, प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराचा प्रश्न कळीचा सातत्याने ते लावू धरत आहेत. महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या माध्यमातून सोनार व्यावसायिकांसाठी जाचक असणारी कलम ४११ रद्द करण्यात आली त्यामुळे आम्हाला फायदा होत आहे. त्यामुळे आम्ही सर्व सोनार समाज बांधव कार्यकारी अध्यक्ष प्रफुल चावरे, विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, जिल्हाध्यक्ष सुधाकर त्रिपुरवर, कोषाध्यक्ष सुमेध कसुळ्कर पाठींबा देत असल्याचे समर्थन पत्रात त्यांनी सांगितले आहे. Sudhir mungantiwar bjp
विश्वब्राम्हण पांचाळ सेवा समिती जिल्हा चंद्रपूर यांनी समाज बांधवानी सभा घेऊन ना. मुनगंटीवार यांना निवडून देण्याचा संकल्प हाती घेतला आहे. यावेळी सुधाकर श्रीपुरवार, रविंद्र मुकुलवार, गिरीश कंठीवार, सचिव बंडोपंत देवोजवार, दिलीप लिंगोजवर यांच्यासह अनेक सदस्यगण उपस्थित होते. राष्ट्रीय संघर्ष समिती ईपीएस ९५ चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष परशुराम तुंडुलवार, पुरुषोत्तम राऊत, अरुण जमदाडे, दीपक जोगी, वसंत शिकारे कृष्णा बागुलकर आदींनी ना. मुनगंटीवार यांना जाहीर पाठींबा दिला आहे. राष्ट्रीय हिन्दू महासभा (भारत) चे प्रदेश अध्यक्ष शिवदास शर्मा यांनी समर्थनपत्र देऊन सुधीर भाऊंच्या विजयाचा संकल्प केला आहे. Sudhir mungantiwar bjp
चंद्रपूर जिल्हा साऊन्ड सिस्टम असोशिएशन यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठींबा दिला आहे. यावेळी असोशिएशनचे अध्यक्ष उमेश लांडगे, देवाशिष गांगुली, अभिजित बेले, हर्षद साखरकर, एड मनीष शर्मा यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. पालेवार भोई समाज चंद्रपूर चे अध्यक्ष अभय बडकेलवार, सचिव राजेंद्र गर्गेनलावर, अजय कोतपल्लीवार, अरुण गर्गेनलावर, प्रदीप गर्गेनलावर यांच्यासह अनेक सदस्यांनी आम्ही ना. मुनगंटीवार यांच्या पाठीशी आहोत असा निर्धार केला. महिला पतंजलि योग समिती महाराष्ट्रच्या नसरीन शेख, स्मिता रेभनकर, वंदना भुशांवर, प्रतिभा रोकडे, स्मिता श्रीगडीवार, सविता मसराम, ज्योती कुंभार, मनीषा गौरकार आदींनी आम्ही सुधीर भाऊंना निवडून आनण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू अशी ग्वाही देऊन समर्थन पत्र दिले आहे.