Sudhir Mungantiwar Manifesto चंद्रपूर लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून राष्ट्रीय पक्ष आपापल्या परीने प्रचार करीत आहे.
अश्यातच भाजप पक्ष 16 एप्रिलला लोकसभा क्षेत्रातील बूथ निहाय नागरिकांच्या घरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नमस्कार मतदार नागरिकांपर्यंत पोहचविणार आहे. याबाबत 15 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली.
आयोजित पत्रकार परिषदेत भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे, महिला आघाडी अध्यक्ष सविता कांबळे, प्रमोद कडू व प्रज्वलंत कडू उपस्थित होते. Sudhir Mungantiwar Manifesto
8 एप्रिलला चंद्रपुरात झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरोघरी जाऊन माझा नमस्कार मतदारांपर्यंत पोहचवा असे आवाहन केले होते, त्या अनुषंगाने 16 एप्रिलला भाजप पदाधिकारी चंद्रपुरातील 379 बूथ, राजुरा 329, वरोरा 339, वणी 338, बल्लारपूर 357 व आर्णी विधानसभा क्षेत्रातील 365 बूथ वर भाजप कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहचणार आहे अशी माहिती राहुल पावडे यांनी दिली. Sudhir Mungantiwar Manifesto
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमस्कार सोबत महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रासाठी असणारा वचन नामा सुद्धा मतदारांना देण्यात येणार आहे. Sudhir Mungantiwar Manifesto
असा आहे मुनगंटीवार यांचा वचननामा..
1) वर्धा नदीवर बंधारे बांधून सिंचनाची सोय करणार.
2)जिवती तालुक्यात सिंचनासाठी व्यवस्था करणार
3) भातांच्या वानांना भौगोलिक मानांकन मिळवून देणार
4)पुसा या कृषी क्षेत्रातील मोठ्या संस्थेच्या मदतीने कृषी विज्ञान केंद्रे उभारणार
5) कोल बेअरिंग ऍक्ट शेतकरी व स्थानिकांच्या हिताचा कसा होईल यासाठी त्यात बदल करण्याचे प्रयत्न करणार
6) कोणत्याही प्रकल्पात शेती जात असेल तर प्रकल्पग्रस्तना सर्वोच्च भाव मिळेल, यासाठी प्रयत्न करणार
7) जिवती येथील वनजमिनीचा प्रश्न निकाली काढणार
8) कृषी आधारित उद्योग आणून शेतकऱ्यांना बळ देणार
9) पांदण रस्ते व शेत रस्ते बांधणार
10) मतदारसंघात आवश्यक ठिकाणी रेल्वे ROB आणि अंडरपास करणार
11) चंद्रपूर ते पुणे व चंद्रपूर ते मुंबई प्रवाश्यांसाठी थेट रेल्वे सुरू करणार
12)मूर्ती विमानतळ पूर्ण करणार
13)मोरवा एअरपोर्ट मध्ये फ्लाईंग क्लब करणार
14)बाबूपेठ रेल्वे पुलावरील निवासी घरांचे पुनर्वसन करून ब्रिज पूर्ण करणार
15) रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करणार
16)चंद्रपूर शहरातून आऊटर रिंग रोड करणार
17)राजुरा व मूल येथे रेल्वे उड्डाणपूल बांधणार
18) नागपूर-चंद्रपूर मेट्रो पुढे राजुऱ्यापर्यंत वाढविणार
19)मोठया शहरांमध्ये शहर बस वाहतूक सुरू करणार
20)नागपूर-हैद्राबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करणार
21)वणी-आर्णी क्षेत्रातील ग्रामीण भागात दळणवळणासाठीपक्क्या रस्त्यांची निर्मिती, ग्रामपंचायतींना नगरपंचायत क्षेत्राला विकसित करणार
22)या विरंगुळा केंद्र, उद्याने उच्च दर्जाची करून गावे हरित करणार
23)गरजूंना घरकुल मिळेल यासाठी प्रयत्न करणार
24)MSME च्या माध्यमातून कुटीर उद्योग उभारणार
25)वेकोलीमध्ये ज्यांच्या जमिनी जातील, त्यांना त्याच प्रकल्पांमध्ये शैक्षणिक अहरतेनुसार नोकरी देणार
26) मतदार संघात नवीन उद्योगांची निर्मिती करणार
27)वेकोलीच्या डम्पिंगमध्ये जी गावे पूरग्रस्त झाली आहे त्या गावांसाठी विशेष योजना करणार
28)महिला बचत गटांसाठी तालुकास्तरावर विक्री केंद्र व स्टीचिंग आणि एमपायरीटी क्लस्टर उभे करणार
29)चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांसाठी ESIC हॉस्पिटल बांधणार
30)लहान उधोगांचे क्लस्टर करणार
31)प्रकल्पग्रस्तांना विशेष पॅकेज देणारा कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार
32)वणी आर्णी क्षेत्रात औद्योगिक क्षेत्र विकसित करून कापूस, सोयाबीन प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य
33)संरक्षित स्मारकांबाबत पुरातत्व विभागाच्या परिशिष्ट जे बांधकाम आहे त्यांना संरक्षण देणार
34)आदिवासींच्या सांस्कृतिक वारसांचे जतन करणार
35)सेवा केंद्र उघडणार
36)प्रत्येक गावात विकासदूत येऊन समस्यांचे निराकरण करणार
37)फिरते जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना देवा देणार
38)आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणार
39)दिव्यांगजन, ज्येष्ठ नागरिक, निराधार महिला, बचत गट यांच्यासाठी विशेष योजनांकडे प्राधान्याने लक्ष देणार.