sudhir mungantiwar on kishor jorgewar चंद्रपूर लोकसभेची रणधुमाळीत निवडणुकीच्या रणांगणात उभ्या असलेल्या उमेदवारांवर टीकेचे राजकारण सुरू आहे, अश्यातच चंद्रपूर विधानसभेचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार या लोकसभा निवडणुकीत कुणाला मदत करणार हा प्रश्न यावेळी उपस्थित झाला असला तरी सध्यातरी जोरगेवार यांनी बोलणे टाळले मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
हे अवश्य वाचा – चंद्रपुरात मोठी राजकीय उलथापालथ
2 एप्रिल ला सर्व जाती धर्माच्या मेळाव्याआधी सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार जोरगेवार यांच्यावर भाष्य केले. sudhir mungantiwar on kishor jorgewar
हे ही वाचा : मुलगी म्हणते पालकांना, आई – बाबा मतदान अवश्य करा
आमदार जोरगेवार हे सध्या महायुती सरकारमध्ये असले तरी त्यांनी कुणाला मदत करावी हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्यांचा उजवा हात असलेल्या माणसाने माझ्यावर रोज घाणेरडी टीका करण्याचे काम सुरू केले आहे, ही बाब जोरगेवार यांना माहीत नसणे म्हणजे आश्चर्यकारक आहे, जोपर्यंत त्यांच्या उजव्या हात असलेल्या माणसाने माझ्याविरुद्ध लिखाण करणे थांबविले नाही तर पुढच्या वेळेस मी मदत करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. sudhir mungantiwar on kishor jorgewar