Sudhir mungantiwar on sanjay raut चंद्रपुरात कितीही सभा घेतल्या तरी विजय हा धानोरकरांचाचं होणार असे वक्तव्य राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केले होते, त्यावर चंद्रपूर महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी राऊत यांचा समाचार घेतला.
राऊत हे नेहमी उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करतात, त्यांना विदर्भातील जनतेचा राग आहे म्हणून ते असे बोलत असतात, कोरोना काळात सुद्धा ज्यांनी पाप केलं त्यांना कोरोना झाला असे वादग्रस्त वक्तव्य ते करीत असतात, पण त्यांच्या वक्तव्याला आम्ही व तुम्हीपण गंभीरपणे घेऊ नका, त्यांची पत्रकार परिषद असली की आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवत पुन्हा ते नवं ज्ञान देणार मात्र ते ज्ञान मनात रुजवू नका असं मनात ठेवत चला. Sudhir mungantiwar on sanjay raut
वर्ष 2014 ला पंतप्रधान मोदी चंद्रपुरात आले होते, त्यावेळी भाजप उमेदवार हंसराज अहिर जिंकले होते, मात्र 2019 ला ते न आल्याने व उमेदवार पडले आता या वर्षीच्या निवडणूक रणसंग्रामात पहिली सभा मोदी यांची होत आहे, त्यावर मुनगंटीवार म्हणाले की मी त्याचा काही विचार केला नाही मात्र हे ऐकून मला आता दोन वाघांची शक्ती मिळाली आहे, जनता मला मतरुपी आशीर्वाद देणार हे नक्की.