Sudhir Mungantiwar Troll : समाजमाध्यमावर सुधीर मुनगंटीवार ट्रोल

Sudhir Mungantiwar Troll लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचत आहे, 8 एप्रिलला हजारो नागरिकांच्या उपस्थितीती मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा चंद्रपुरात पार पडली.

 

मात्र या प्रचारसभेतील मुनगंटीवार यांचं भाषण समाजमाध्यमावर चांगलेच ट्रेंड होत आहे, त्यामध्ये 1984 साली झालेल्या दंगलीचा उल्लेख करीत बहीण भावाबद्दल त्यांनी भाष्य केलं, मात्र ते भाषण 8 एप्रिल पासून उच्चशिक्षित उमेदवारांची अशोभनीय भाषा म्हणून ट्रेंड होत आहे. Sudhir Mungantiwar Troll

Narendra modi rally chandrapur

जाहीर सभेत हजारो महिलांसमोर मुनगंटीवार यांचे अशोभनीय शब्द, सुधीर मुनगंटीवार यांचा जाहीर निषेध, काय ही भाषा, आता भाऊ म्हणायला सुद्धा लाज वाटत आहे, हे वाक्य व ती क्लिप समाजमाध्यमावर चांगलीच ट्रेंड झाली आहे. Sudhir Mungantiwar Troll

हे ही वाचा : एकनाथ शिंदे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

आम्ही विकासावर राजकारण करतो म्हणणारी भाजप आता खालच्या स्तरावर उतरली आहे, एकीकडे नितीन गडकरी यांनी भरसभेत केलेला शिलाजीत चा उल्लेख सुद्धा अजूनही माध्यमावर ट्रेंडिंग मध्ये आहे, एका महिलेला हरविण्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदी यांना चंद्रपुरात यावं लागत आहे. Sudhir Mungantiwar Troll

 

या सर्व ट्रोलिंग वर मुनगंटीवार यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

१९८४ साली काँग्रेस ने केलेल्या अत्याचारांची आठवण करुन दिली तर इतक्या मिरच्या झोंबल्या. अर्धवट क्लिप वायरल करुन काँग्रेस ने जनतेवर केलेले अन्याय तुम्ही लपवू शकणार नाही. १९८४ च्या दंगलीत असे अत्याचार झालेच नाहीत असं छाती ठोक पणे मला काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावं. काँग्रेसच्या हुकूमशाही राजवटीवर मी नेहमी बोलत राहीन आणि तुमच्या अशा खोडसाळपणामुळे मी बिलकुल घाबरणार नाही.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!