Sudhir Mungantiwar’s reaction : त्या लाखो नागरिकांना काही वाटलं नाही पण तुम्हाला… – सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar’s reaction 8 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी कांग्रेस काळात झालेल्या आणिबाणीबाबत वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढत अर्धवट क्लिप कांग्रेसतर्फे व्हायरल करण्यात आली त्यावर आज सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही अवश्य वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील पहिल्या मतदाराने केले मतदान

कांग्रेसने लावलेल्या आणीबाणीत अनेक घटना घडल्या, महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या, त्यावेळी पेपर मध्ये बातमी देण्याआधी आधी तपासणी व्हायची, 1984 च्या शीख दंगलीत पत्नीसमोर पतीला आगीत टाकण्यात आले होते, या सर्व बातम्या वर्तमानपत्रात छापून आल्या होत्या. Sudhir Mungantiwar’s reaction

हे ही वाचा – महिला कांग्रेसने केला मुनगंटीवार यांचा निषेध

त्यावर कांग्रेस पक्षाने खंडन करण्याऐवजी माझ्या भाषणाची अर्धवट क्लिप पूर्ण न ऐकता घरात बसून सर्वत्र व्हायरल करण्यात आली, कांग्रेस उमेदवार धानोरकर यांनी दिल्लीवरून सोशल मीडिया टीम कामाला लावली आहे, मोदी यांच्या सभेतील विशाल जनसमुदाय बघून कांग्रेसला पोटदुखी झाली त्यामुळे माझ्या भाषणाची अर्धवट क्लिप सर्वत्र पसरविण्यात आली, विकासाच्या नावावर मते मागा तेव्हा जनता जागा दाखवेल अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. Sudhir Mungantiwar’s reaction

 

त्यावेळी जे घडलं ते अतिशय भयावह होत मात्र आज अघोषित आणीबाणी असल्याचे वातावरण देशात आहे, मणिपूर आजही हिंसेने जळत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर ब्र सुद्धा काढला नाही, कांग्रेस पक्षाने असं केलं त्यांनी तसं केलं बस भाषण केले आणि निघाले, महिला पैलवान यांच्यावर भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी लैंगिक अत्याचार केला असे आरोप लावण्यात आले होते, मात्र त्यांच्याबाबत सुद्धा सरकार गप्प आहे. Sudhir Mungantiwar’s reaction

 

सरकार मधील मंत्र्यांना विरोधात प्रश्न विचारले तर त्यांना जेल मध्ये किंवा कामावरून काढण्यात येते, उत्तर प्रदेशातील उन्नाव व हातरस ची घटना आजही देश विसरू शकला नाही, कोरोना काळात मजुरांचा मृत्यू झाला, त्यांना परत जाण्यासाठी मोदी सरकारने काही केले नाही, मात्र देशात विमानाद्वारे चित्ते आणण्यात आले. Sudhir Mungantiwar’s reaction

 

आज चंद्रपूर लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, आधीचे जातीचे राजकारण, त्यानंतर विकास, विधवा महिलेचे अश्रू, सहानुभूती, शिलाजीत आणि आता सरळ आणीबाणी मधील आक्षेपार्ह वक्तव्य, यामुळे विकास हा खाटेवर लेटविण्यात आला असे चित्र जिल्ह्यात निर्माब झाले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील समस्या – प्रदूषण, बेरोजगारी, सिंचन व्यवस्था, चंद्रपुर व इतर ग्रामीण भागात येणारा पूर, बाबूपेठ उड्डाणपूल असे अनेक महत्वाचे कामे कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे, त्यावर मात्र चर्चा होताना दिसत नाही आहे, ही निवडणूक विकासाच्या दिशेने सुरू होत व्यक्तिगत झाली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!