Systematic Voters Education and Electoral Participation : आई-बाबा मतदान करा

Systematic Voters Education and Electoral Participation प्रत्येक बालक हा त्यांच्या पालकाचा लाडका असतो, त्यामुळे त्याच्या आग्रहाला किंवा आवाहनाला पालक संमती देतातच,हे लक्षात घेऊन येत्या लोकसभा सार्वत्रीक निवडणुक 2024 अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांद्वारे संकल्पपत्र भरून घेतले जात आहे. यातील संदेशानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांना पत्र लिहुन निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

 

निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला हक्क बजावणे आवश्‍यक आहे. लोकशाहीच्या मजबुतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून “सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पारर्टीसिपेशन’ (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत मनपा शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेत, त्यांना त्यांच्या पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. Systematic Voters Education and Electoral Participation

 

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मतदान जाणीव जागृती करण्याकरिता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मतदारांना संवैधानिक कायदेशीर तरतुदीबाबत माहिती देणे, निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे यांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग याबाबत माहिती देणे, निवडणूक प्रक्रियेबाबत अवगत करणे तसेच महिला, वृद्ध, महाविद्यालयीन विद्यार्थी आदी घटकांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करण्याचे काम स्वीपच्या माध्यमातून केले जात आहे. Systematic Voters Education and Electoral Participation

 

त्याचाच एक भाग म्हणून मतदार संघांतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचा मतदान प्रक्रियेत शंभर टक्के सहभाग असावा, मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी, सक्षम लोकशाहीसाठी सर्वांनी मतदानाचा हक्क निर्भीड आणि निरपेक्षपणे बजवावा यासाठी मतदारांमध्ये जाणीव, जागृती निर्माण व्हावी म्हणून स्वीप अंतर्गत सर्व विद्यार्थी व पालक यांच्याकडून संकल्प पत्र भरून घेण्यात येत आहेत. यामध्ये तयार केलेल्या संकल्प पत्राची प्रत शालेय विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांना देण्यात येत आहे. यासाठी मनपा शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!