Teli community does not support MVA 12 एप्रिलला रात्री मातोश्री विद्यालय येथे तेली समाजाचा सामाजिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्या मेळाव्यात 12 तेली समाज संघटनांनी चंद्रपूर व गडचिरोली लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला.
मात्र त्या बैठकीत तेली समाजातील विविध गटाने गदारोळ केला, आम्हाला न सांगता तुम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाचं कसा? असा प्रश्नांचा भडिमार आयोजक सूर्यकांत खणके यांना करण्यात आला. Teli community does not support MVA
हे ही वाचा – विदर्भातील 12 तेली समाज संघटनेचा महाविकास आघाडीला पाठिंबा
दुसऱ्या दिवशी सकाळपासून खणके यांचा समाजमाध्यमावर तेली समाजाने निषेध दर्शविला, मात्र संत श्री संताजी मंडळ बल्लारपूर ने याबाबत मोठा खुलासा केला आहे. Teli community does not support MVA
मंडळाचे अध्यक्ष अशोक झोडे म्हणाले की आम्हाला समाजातील काही लोकांचा सत्कार करण्यात येत असल्याचे निमंत्रण मिळाले होते, मात्र काही कारणास्तव मी आणि सचिव यशवंत बोंबले हे त्या मेळाव्यात जाऊ शकले नाही.
राजकारणाची बातमी अवश्य वाचा – चंद्रपुरात ठाकरे गटाने भाजपला दिला जोर का झटका
मात्र सदर कार्यक्रमात तेली समाजातील विविध संघटनांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला अशी माहिती पुढे आली त्यामध्ये आमच्या संघटनेचे नाव आणि अध्यक्ष व सचिव यांची सही होती. Teli community does not support MVA
आम्ही दोघे गेलो नसताना आमच्या खोट्या सह्या कुणी व का केल्या? याबाबत आम्ही माहिती काढत आहो, आम्ही कोणत्याही उमेदवार किंवा पक्षाला पाठिंबा दिला नाही अशी प्रतिक्रिया झोडे यांनी दिली आहे.
याबाबत आम्ही तेली समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेत खुलासा करणार अशी माहिती झोडे यांनी दिली. पाठिंबा नाट्य मध्ये 12 पैकी एका संघटनेने पाठिंबा दिली नसल्याची कबुली दिली आहे, उर्वरित 11 संघटना याबाबत काय खुलासा करतात याकडे तेली समाज बांधवांचे लक्ष लागले आहे.