Teli community support for Dhanorkar चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एक मोठी बातमी पुढे आलेली आहे, आज 12 एप्रिल रोजी मातोश्री विद्यालयात तेली समाज जिल्हा तर्फे सामाजिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात तेली समाजाने चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना जाहीर पाठिंबा दिला, यावेळी पाठिंब्याचे पत्र कांग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना देण्यात आले. Teli community support for Dhanorkar
हे ही वाचा – स्लॅब झाले हाऊसफुल्ल, प्रतिभा धानोरकर यांची प्रचारसभा
आयोजित मेळाव्यात विदर्भ तेली समाज महासंघाचे धनराज मुंगळे, तेली युवक मंडळ, तेली समाज बहुउद्देशीय संस्था, संताजी स्नेही मंडळ भद्रावती, हनुमान मंदिर पंचतेली समाज जटपूरा, संताजी स्नेही मंडळ सिंदेवाही, संत श्री संताजी सेवा मंडळ बल्लारपूर, तेली युवक मंडळ राजुरा, श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज विसापूर, श्री संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ ब्रह्मपुरी, श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय तैलिक विकास संस्था कोरपना, जय संताजी तेली समाज तळोधी बाळापूर अश्या असंख्य तेली समाजाच्या संघटनांनी आपला पाठिंबा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिला आहे. Teli community support for Dhanorkar