Trending Loksabha Election Manifesto : गोरगरिबांना ब्रँडेड दारू पिण्याचा अधिकार, लोकसभा उमेदवाराचा जाहीरनामा

Trending loksabha election manifesto लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे, सध्या राज्यात दारू विषयाच्या मुद्द्यावर ट्रेंडिंग असलेल्या अखिल भारतीय मानवता पक्षाच्या लोकसभा उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांनी आपला जाहीरनामा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केला आहे.

हे अवश्य वाचा – अब की बार चंद्रपूर जिल्ह्यातून 13 तडीपार

पत्रकार परिषदेत वनिता राऊत म्हणाल्या की रेशन कार्ड वर गरीब नागरिकांना ब्रँडेड दारू आम्ही निवडून आल्यावर देण्याची व्यवस्था करणार, जिल्ह्यातील 500 लोकसंख्या असलेल्या गावात बेरोजगार तरुणांना बिअर बार चे परवाने देण्यात येणार, गावात अधिकृत दारूचे दुकान उघडण्यात येणार नाही तोपर्यंत नागरिकांना शुद्ध व स्वस्त दारू उपलब्ध होणार नाही, त्यासाठी हे काम आम्ही निवडून आल्यावर लगेच करणार आहोत. Trending loksabha election manifesto

हे अवश्य वाचा – त्याला सांभाळा, तो माझ्यावर टीका करतोय 

प्रत्येक गावात शासकीय बिअर बार मध्ये गावकरी हे थाटात बसून दारू प्यायला हवे अशी व्यवस्था करणार.
सोबतच रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला किमान शंभर दिवसाचा रोजगार व किमान मजुरी ही शासकीय चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या पगाराएवढि करण्यात आली तर गोरगरीब जनतेला रक्षण कार्डवर मद्य देण्याची गरजच भासणार नाही. Trending loksabha election manifesto

हे ही वाचा : चंद्रपुरात लव्ह जिहाद?

गरीब लोक बिअर बार मध्ये जाऊन थाटात दारू पिणार.
जनतेला आनंदी सुखी समाधानी ठेवण्याचे काम हे सरकारचे आहे व तेच काम निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही करणार आहो, नागरिकांनी ब्रँडेड दारू पित स्वतःच आत्मशांतीचा अनुभव जोपासावा अशी माझी इच्छा आहे, मनाला आनंदित व प्रफुल्लित करण्यासाठी मद्य सेवन करणाऱ्या लाखो लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसणार, लोकांना या माध्यमातून आनंदित करणे हे पुण्याचे काम मी करणार असे आश्वासन वनिता राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिले. Trending loksabha election manifesto

मी जर निवडून आली तर सर्वप्रथम गाव तिथे बिअर बार, गाव तिथे दारूचे दुकान, गोरगरीब जनतेला रेशनकार्ड च्या माध्यमातून विदेशी ब्रँडेड दारूचे वितरण करणारा, तेव्हा मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकावा अशी प्रतिक्रिया राऊत यांनी यावेळी दिली. Trending loksabha election manifesto

राज्यात सध्या वनिता राऊत ह्या दारूच्या मुद्द्यावरून ट्रेंडिंग वर आहे, त्या निवडून येवो की नाही मात्र त्यांचा हा मुद्दा मद्यप्रेमींसाठी एक पर्वणी सारखा नेहमीच लक्षात राहणार.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!