Voting awareness campaign निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला हक्क बजावणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या मजबुतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून “सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्ट्रोरल पारर्टीसिपेशन’ (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
आज चंद्रपुरातील श्री महर्षी विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांनी मतदानाची जनजागृती करण्यासाठी ‘मतदान करा’ हे शब्द ड्रोन द्वारे प्रदर्शित करत मानवी साखळी तयार केली होती. Voting awareness campaign
या कार्यक्रमात उपस्थित असलेले जिल्हा अधिकारी विनय गौडा म्हणाले असे उपक्रम जिल्ह्यात राबविले तर मतदानाची टक्केवारी या माध्यमातून नक्की वाढु शकेल, कारण विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे त्यांच्या माध्यमातून हि जनजागृती राबवली तर ते आपल्या आई वडिलांना मतदान नक्की करावे यासाठी ते प्रोत्साहित करतील. Voting awareness campaign