A terrible accident : आईस्क्रीम खात असताना घडलं असं भयावह

गुरू गुरनुले

A terrible accident मुल – उन्हाळयाचे दिवस असल्याने टेकाडी सिंदेवाही वरुन चंद्रपूरकडे येथुन मूल येथे आईस्क्रीम खाण्यासाठी आलेल्या युवकांवर सिंदेवाही जाणाऱ्या वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे त्या युवकाला धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना मूल येथील गांधी चौकात रविवारी रात्रौ 10 वाजताच्या दरम्यान घडली.

 

A terrible accident प्रज्योत नरेंद्र गेडाम वय 20 वर्षे मूल तालुक्यातील आकापूर येथील मृत्तक युवकाचे नांव आहे.
नर्सिंग विद्यालयात नर्सोंगचे कोर्स करीत असलेल्या प्रज्योत नरेंद्र गेडाम वय 20 वर्षे रा. चोरगांव त. चंद्रपूर हा विद्यार्थी आपल्या काकाकडे टेकाडी येथे राहात होता.

 

A terrible accident रविवारी जेवन केल्यानंतर आईस्क्रिम खायची इच्छा झाल्याने तो अनिकेत गोंगले वय 19 वर्षे आणि मुस्ताक अल्ली सय्यद वय 21 वर्षे रा. टेकाडी या मित्रांसोबत मूल येथे आला.

 

दरम्यान गांधी चौक येथील आईस्क्रीमच्या दुकानातुन तो आईस्क्रिम घेवुन खात असतानाच सिंदेवाही वरुन चंद्रपूर कडे जाणारा ट्रक क्रं. एम एच 40 बि जी 8268 चे चालक मनोजकुमार व्दारकासींग तिवारी वय 55 वर्षे रा. नागपूर याचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने प्रज्योत नरेंद्र गेडाम यांना जबर धडक दिली. यात तो जागीच ठार झाला, इतर जवळपास असलेल्या नागरीकांनी इतरत्र पळापळ केली, जवळच असलेल्या एका ऑटोलाही ट्रकनी धडक दिली, मात्र ऑटोचे नुकसान झालेले नाही.

 

मृत्तकाचे मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून शव नातेवाईकांना सुपुर्द करण्यात आले.
आरोपीवर मूल पोलीस स्टेशन येथे कलम 279, 337, 304 (अ) भादवी, मुंबई पोलीस अॅक्ट कलम 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ठाकरे, पोलीस अमलदार यशवंत कोसनशिल्ले, रफीक शेख करीत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!