Action to remove encroachment : चंद्रपुरातील अतिक्रमण हटाव मोहिमेचा जाहीर निषेध

Action to remove encroachment चंद्रपूर शहरात मनपाद्वारे सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव कारवाई चा शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व कांग्रेस महानगर अध्यक्ष रामू तिवारी यांनी आज 15 मे रोजी जाहीर निषेध नोंदविला.

अवश्य वाचा : महावितरण केला AI तंत्रज्ञानाचा वापर, सुरू केली ही सेवा

2 मे पासून शहरात मनपाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली मात्र या कारवाईचा सर्वात मोठा फटका हा लहान दुकानदारांना बसत आहे, ऊन व पावसापासून बचावासाठी बनविलेल्या शेड, चाय टपरी यावर मनपा प्रशासन कारवाई करीत आहे मात्र शहरात नियमबाह्य निर्माण करण्यात आलेल्या इमारतीवर कारवाई करायचे सोडून लहान दुकानदारांना मनपा त्रास देत आहे असा सवाल रामू तिवारी यांनी यावेळी उपस्थित केला.

शैक्षणिक बातमी : चंद्रपूर जिल्ह्यातील वर्ग 10 वी च्या परीक्षेतील टॉपर

Action to remove encroachment ठाकरे गट शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेचा आम्ही विरोध करीत नसून स्वागत करतो मात्र कारवाई समान व्हायला हवी चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम या कारवाईतून दिसत आहे, हे थांबायला हवं मोठ्या व्यापारी वर्ग ज्यांनी नियमबाह्य अतिक्रमण केले त्यांना अभय देत छोट्या दुकांनदारांवर कारवाई बडगा उभारणे हे चुकीचे आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो.

दोन्ही पक्षांना उशिरा जाग

मनपाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला 10 ते 12 दिवसांचा कालावधी लोटल्यावर दोन्ही पक्षांना मात्र उशिरा जाग आली, या कारवाईच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष दीपक जयस्वाल यांनी सर्वप्रथम निषेध नोंदवीत, कारवाई मध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप केला होता.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!