Amrit Yojana Chandrapur चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात अमृत योजनेचे काम सुरू केले होते, मात्र कामाचा अवधी पूर्ण झाल्यावर सुद्धा आजही अनेक भागात अमृत ची पाईपलाईन पोहचली नाही, ज्या भागात पाईपलाईन गेली त्या भागात पाणी पोहचले नाही अशी दैना आज चंद्रपूर मनपाने शहरात करून ठेवली आहे, मात्र याविरोधात भाजपचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी आवाज उठवीत 15 मे ला रस्ता रोको आंदोलन केले.
अवश्य वाचा : RTE बाबत महत्वाची माहिती
त्यांच्या रस्ता रोको आंदोलनाला यश मिळाले असून येत्या 10 दिवसात सुमित्रा नगर या वस्तीमध्ये अमृत चे पाणी येणार असे आश्वासन आंदोलन कर्त्याना मिळाले आहे.
अवश्य वाचा : आम्हाला नोडल अधिकारी हवा
Amrit Yojana Chandrapur 5 वर्षांपूर्वी मनपाने अमृत योजनेच्या कामाला प्रारंभ केला, त्यानंतर 3 मे 2021 मध्ये तुकूम प्रभागातील सुमित्रा नगर भागात अमृत पाणीपुरवठा योजनेचे उदघाटन करण्यात आले, मात्र 3 वर्षाच्या कालावधीत सुमित्रा नगर येथील अमृत च्या पाईपलाईन मध्ये पाण्याचा थेंब आला नाही, पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी याबाबत माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्याकडे तक्रारी केल्या, याबाबत त्यांनी मनपा ला वेळोवेळी निवेदने दिली मात्र निवेदनावर काही कारवाई होत नसल्याने 15 मे रोजी सुमित्रा नगर भागातील नागरिकांना सोबत घेत तुकूम मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांनी हातात घागर घेत आंदोलन केले.
यावेळी मनपाचे अधिकारी आंदोलनात पोहचले त्यांनी आंदोलन कर्त्याना येत्या 10 दिवसात आपल्या भागात नियमित पाण्याचा पुरवठा सुरू होणार असे आश्वासन दिल्यावर सदर आंदोलन मागे घेण्यात आले.
Amrit Yojana Chandrapur यावेळी माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले की 10 दिवसात जर पाणी या भागात आले नाही तर आम्ही सर्व नागरिक मनपा कार्यालयात पोहचत मनपा ला कुलूप ठोकल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी तुकुम प्रभागातील अनेक नागरिक उपस्थित होते.
आंदोलनानंतर सुमित्रा नगर भागतील आंदोलनकर्ते नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली, आंदोलनादरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.