Animal census in tadoba चंद्रपूर – आज 23 मे ला बुध्द पौर्णिच्या रात्री लखलत्या चंद्रप्रकाशात ताडोबातील बफर व कोअर झोनमध्ये वन्यप्राणी गणना होणार आहे. दोन्ही झोनमध्ये वनविभागाने तयारी पूर्ण केली असून पर्यटक व अधिकारी सज्ज झाले आहेत. बफर मध्ये 75 मचाणी वरून 150 पर्यटक प्राणी गणना निसर्गानुभव घेणार आहेत. तर कोअर मध्ये एकूण 76 मचाणीवरून अधिकारी स्वत:च प्राणी गणना करणार असल्याची माहिती ताडोबाच्या सुत्रांनी दिली आहे.
महत्वाची माहिती – आता राज्यातील सर्व मुलींना मिळणार उच्चशिक्षण मोफत
Animal census in tadoba बुध्द पौर्णिमेला रात्री चंद्र हा पूर्ण निघतो. लख्ख स्पष्ट प्रकाश देतो. ह्या प्रकाशात वन्यप्राण्यांच्या हालचाली स्पष्टपणे टिता येतात. त्यामुळेच परंपरागत काळापासून वन्यप्राणी गणनेची चालत गणना बुध्द पौर्णिमेच्या रात्री न चुकता केली जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प देशभरात व्याघ्र दर्शनाकरीता प्रसिध्द असे ठिकाण आहे.
अवश्य वाचा : 12 वी नंतर हे कोर्स करा, मिळेल भरघोस पगार
आज गुरूवारी (23 मे) ला सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ताडोबातील बफर व कोअर झोनमध्ये प्राणी गणना पार पडणार आहे. बुध्द पौर्णिमेच्या रात्री होणारी वन्यप्राणी गणना हा एक निसर्गानुभवाचा कार्यक्रम आहे. बफर झोनमध्ये वन्यप्राणी गणना हि निसर्ग,पर्यटनप्रेमी किंवा अशासकीय संस्था यांचे माध्यमातून केली जाते. यानिसर्गानुभवाकरीता ऑनलाईन व ऑफलाईन प्रवेश देण्यात आले. त्यामध्ये 295 पर्यटनप्रेमींनी बुकींग केली असून त्यापैकी 150 पर्यटनप्रेमींना प्रत्यक्ष प्राणी गणनेची संधी मिळाली आहे.
Animal census in tadoba ही प्राणी गणना पाणवट्याजवळ किंवा पाण्याच्या ठिकाणी केली जाते. बफर झोनमध्ये 75 मचानी उभारण्यात आल्या आहेत. मचानी ह्या लोखंडी तयार करण्यात आलेल्याआहेत. एका मचानीवर दोन व्यक्ती बसून त्यामध्ये एक पर्यटनप्रेमी व एक वनविभागाचे गाईड राहतील. प्रगणनेकरीता आवश्यक साहित्य वनविभागाचे वतीने पुरविले आहे.
ताडोबातील बफर झोनमध्ये मोहूर्ली, मुल, चंद्रपूर, शिवणी, पळसगाव व खडसंगी आदी 6 रेंज मध्ये ही प्रगणना होईल. आज गुरूवारी सायंकाळी 6 वाजता गणना सुरू होईल. उद्या शुक्रवारी सकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 12 तास ही प्रगणना चालेल. त्यानंतर निसर्गप्रेमींना त्या ठिकाणावरून परत जावे लागेल. तत्पूर्वी या ठिकाणी 16 प्रवेशद्वारावरून निसर्गानुभवाचा आनंद घेणाऱ्या 160 पर्यटनप्रेमींना वनविभाग आज सायंकाळी साडेपाचवाजेपर्यंत गणना होणाऱ्या मचाणीच्या ठिकाणापर्यंत पोहचविणार आहे.
Animal census in tadoba बुध्द पौर्णिमेच्या रात्री होणारी वन्यप्राण्यांच्या गणनेतील माहिती फक्त डाटा सकंलन म्हणून करण्यात येते, त्या माहितीच्या आधारे वन्यप्राण्यांची आकडेवारी घोषीत केली जात अशी माहिती ताडोबा प्रशासनाने दिली आहे. गणना करणाऱ्या निसर्गप्रेमींच्या सुरक्षेकरीता वनाधिकारी उपस्थित राहतील. निसर्गप्रेमींना भोजन व अन्य सुविधा स्वत: करावी लागणार आहे.
कडक उन्हाळ्याचे दिवस आहे. चंद्रपूरचा पारा 42 अंशापार गेला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची भटकंती पाणी पिण्यासाठी पाणवट्याकडे होणार असून निसर्गप्रेमींना हा अनुभव प्रत्यक्षात पाहता येणार आहे. पाणवट्याशिवाय नैसर्गीक पाण्याच्या स्त्रोतांकडेही वन्यप्राणी भटकंती करणार असल्याने पर्यटनप्रेमींना रात्रभर जागून निसर्गानुभवाचा आनंद घेऊन वन्यप्राण्यांची गणना करण्याची संधी मिळाली आहे. या निसर्गानुभवाचा खरा उदेश्य म्हणजे वन्यप्राण्यांबद्दल आत्मीयता निर्माण करणे, वन्यप्राण्यांबाबत जनजागृती करणे हा आहे.
Animal census in tadoba ताडोबातील कोअर झोन हा अतीसंवेदनशील भाग आहे. त्यामुळे कोअर झोनमध्ये वन्यप्राण्यांची गणना ही ताडोबातील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारीच स्वत: करणार आहे. याकरीता कोअर झोन मध्येही मचानी उभारण्यात आल्या बसून अधिकारी कर्मचारी सज्ज झाले आहेत. दोन्ही झोनमध्ये एकाच वेळी आज सायंकाळी 6 ते उद्या सकाळी 6 वाजतापासून वन्यप्राण्यांची गणना होईल.