गुरू गुरनुले
Attempt to usurp space मुल – मुल नगरातील सर्व्हे नं. ९४ (श्रमिक नगर वार्ड क्रं. ०८) मध्ये चालु असलेले ओपन स्पेस मधील जागा मंदिराच्या नावाखाली हडपून त्यावर अवैद्य बांधकाम करण्यासाठी चालविलेली धडपड त्वरित थांबवावी अशी मागणी नगर परिषद प्रशासन मुख्याधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे श्रमिक नगर मधील अधिकृत प्लॉट धारकांनी केली आहे.
Attempt to usurp space श्रमिक नगर वार्ड क्रं.८, सर्वे नं. ९४ मध्ये एकूण ९० प्लॉटधारक असून त्यात २९९२ स्के. मीटर एवढा ओपन स्पेस आहे. शासकीय नियमाप्रमाणे ओपन स्पेस मध्ये फक्त १० ते १५ टक्के एवढेच बांधकाम करायचे असते. परंतु या ठिकाणी अगोदरच ओपन स्पेस मध्ये मंदिर २५०० स्के. फुट, एक सभागृह-२००० स्के. फुट, एक स्वयंपाकगृह ५०० स्के. फुट, एक शौचालय व अतिक्रमीत शाळेच बांधकाम झालेले आहे.
Attempt to usurp space तरी पुन्हा उर्वरीत जागेवर मंदिराच्या नावाने सभागृह अंदाजे ५००० स्के. फुटचे अवैध बांधकाम सुरु करुन जागा हडपण्याचा गैरप्रकार राजरोसपणे सुरु केले आहे. जर असे गैरकायदेशिर बांधकाम सुरु राहिल्यास लेआऊट मधील मुळ प्लॉटधारकांना हक्काची जागा व त्यांचे मुलांना खेळण्याकरीता तसेच वयोवृध्द व्यक्तीकरीता मनमोकळे फिरण्यासाठी जागाच शिल्लक राहणार नाही. आणि सर्वांच्या हक्काच्या जागेवर स्वातंत्र्य हिसकाविण्याचा प्रयत्न चालविला आहे.
वस्तुस्थिती पाहिली असता असे लक्षात येते की, मंदिराच्या नावाने जागा हडपून, अधिकार गाजवून जागा ताब्यात घेण्याचे षडयंत्र सुरु आहे.
करीता मागील फेब्रुवारी महिण्यात ओपन स्पेस डेव्हलपमेंट करुन त्यात ग्रीन जिम, ट्रॅक, बगीचा संपूर्ण सौंदर्याकरण करण्यात यावे असे निवेदन यापूर्वि सुद्धा प्रशासनाला देण्यात आलेले आहे. तरी देखील नगर परिषद प्रशासन अजूनही जागे झाले नाही.
त्यामुळे आम्हा प्लॉट धरकावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात पुढील पाऊल उचलण्यास प्रशासन आम्हाला जागे करीत असल्याचे दिसून येत आहे. जर का अनधिकृत मंदिराचा मुद्दा पुढे करून जागा हाडपण्याचा प्रकार होत असेल तर ते खपऊन घेतले जाणार नाही असा इशारा देण्यात येईल असे निवेदन कर्त्यानी बोलून दाखविले आहे.