CBSE result class 10th वर्ष 2024 ला सीबीएसई वर्ग 10 वी चा निकाल 13 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर झाला, या निकालात भद्रावती येथील अयान अब्बास अजानी या विद्यार्थ्याने चंद्रपूर जिल्ह्यातून 98.80 टक्के गुण घेत प्रथम क्रमांक पटकाविला.
अवश्य वाचा : या तारखेपासून सुरू होणार RTE प्रवेश नोंदणी प्रक्रिया
अयान हा चंद्रपुरातील नारायणा विद्यालयम येथे शिकत आहे, त्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले आहे, विशेष बाब म्हणजे अयान ने कुठेही कोचिंग लावली नव्हती, अभ्यासात त्याला ज्यावेळी समस्या उदभवायची त्यावेळी आई-वडील त्याचे शिक्षक बनून त्याला अभ्यासात सहकार्य करायचे.
CBSE result class 10th यंदा च्या निकालात नारायणा विद्यालयम मधील 3 मुलांनी चंद्रपूर जिल्ह्यातून टॉप केलं.
अयान सोबत अनुष्का सिंह 97.80 टक्के अंक घेत दुसऱ्या स्थानावर तर देवांशी जाजू ने 96.80 टक्के अंक घेत तिसऱ्या स्थानावर मजल मारली आहे.