CBSE Topper class 12th 13 मे रोजी सीबीएसई बोर्डाचा वर्ग 10 वी व 12 वी चा निकाल जाहीर झाला, यामध्ये वर्ग 12 वी ची नारायणा विद्यालयम मधील कल्याणी गुप्ता ह्या विद्यार्थिनीने 94.80 टक्के गुण पटकावीत जिल्ह्यात प्रथम आली.
अवश्य वाचा – cbse 10 वीच्या निकालात अयान अजानी ने मारली बाजी
CBSE Topper class 12th कल्याणी ही चंद्रपुरातील विनोद गुप्ता यांची कन्या आहे, अभ्यासात आई-वडिलांची साथ हे माझ्या यशाचं महत्वाचं कारण होय, व 12 वी च्या परीक्षेत आई-वडील व शिक्षकांद्वारे अभ्यासाचे उत्तम नियोजनात मोठा वाटा असल्याची प्रतिक्रिया कल्याणी ने दिली आहे, पुढे शिक्षण पूर्ण केल्यावर मला सीए व्हायचं असं माझं स्वप्न आहे अशी इच्छा कल्याणी ने यावेळी व्यक्त केली.