Chandrapur News Today : आता चर्चा चंद्रपूर मद्य घोटाळ्याची

Chandrapur news today चंद्रपूर: चंद्रपूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील,दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालयीन अधीक्षक अभय खताळ यांचे विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे दाखल केले.

 

Chandrapur news today या तीन आरोपी पैकी दोन आरोपींना अटक झाली असून अधीक्षक संजय पाटील फरार आहेत. अधीक्षक संजय पाटील यांना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक मंजुषा भोसले यांच्याकडे केली. चंद्रपूरच्या मद्य घोटाळ्यातील आरोपींची चौकशी करून कारवाई करण्याच्या बाबत यावेळी उपाधीक्षक भोसले यांना स्मरणपत्र दिले.यावेळी जनविकास सेनेचे घनश्याम येरगुडे, इमदाद शेख, अक्षय येरगुडे, प्रफुल बैरम, गितेश शेंडे, अमोल घोडमारे उपस्थित होते.

 

Chandrapur news today चंद्रपूर जिल्ह्यात देशी विदेशी दारूचे दुकान,बियर बार,वाईन शॉप, बियर शॉपी यांना मंजूरी देतांना झालेल्या गैरव्यहाराविरुद्ध कारवाई करण्याकरिता स्मरण पत्र दिले.यापूर्वी जिल्ह्यातील अनेक दारू दुकानांच्या वाटपामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची पुराव्यानिशी तक्रार जनविकास सेने तर्फे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

अवश्य वाचा बातमी भ्रष्टाचाराची : 3 शासकीय नोकरदाराने बिअर शॉप मालकाला मागितली 1 लाखांची लाच

आज पुन्हा एकदा जनविकास सेनेच्या शिष्टमंडळाने पुराव्यांचा गठ्ठा घेऊन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात धडक दिली.या विभागाचे पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांची भेट घेऊन जुन्या तक्रारीबाबत स्मरणपत्र दिले.

नियम धाब्यावर बसवून दारू दुकानांना मंजूरी

राज्य उत्पादन शुल्क विभाग, महसूल विभाग तसेच पोलीस विभाग या सर्व विभागातील मंत्रालयापासून जिल्हास्तरापर्यंत कार्यरत अधिकाऱ्यांनी संगनमत करून नियम धाब्यावर बसवून चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रकारच्या दारू दुकानांना परवाने दिले. अवैध व बेकायदा बांधकाम असलेल्या अनेक इमारतींमध्ये सरसकट दारू दुकानांना मंजुरी देण्यात आली. अंतराचे नियम पायदळी तुडविण्यात आले. याचा मोबदला म्हणून या विभागाच्या अधिकाऱ्यांनी करोडो रुपयांची लाच दारू दुकानदारांकडून स्वीकारली.

Chandrapur news today चंद्रपूरचे तात्कालीन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचे सह विविध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांची नावासह व पुरावे देऊन जनविकास सेनेने सुमारे दोन वर्षांपूर्वी तक्रार केली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्याचे महासंचालक तसेच नागपूरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे सुद्धा तक्रार करण्यात आली होती. मात्र आजपर्यंत कोणतीही चौकशी अथवा ठोस कारवाई चंद्रपूरच्या मद्य घोटाळ्यातील आरोपीं विरुद्ध करण्यात आली नाही. नुकतीच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक झाल्यामुळे पुन्हा एकदा जनविकास सेनेने आक्रमक भूमिका घेतली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!