Chandrapur news today चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी येथे 7 मे रोजी धक्कादायक घटना घडली, गोंडपीपरी न्यायालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या तलावात 2 मुले बुडाली.
महत्वाची बातमी – चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकानो आपण यांना पाहिलंत का?
Chandrapur news today मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास काही मुले फिरायला गेली होती, त्यानंतर मुलांना त्या तलावात पोहण्याचा मोह आवरला नाही, तलावात पोहत असताना दोन मुले बुडायला लागली, ते दृश्य बघून इतर मुले घराकडे गेली, मात्र त्यांनी इतरत्र त्याबाबत कुणालाही सांगितले नाही.
Chandrapur news today 2 मुले सायंकाळी घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेणे सुरू केले, मुले पोहायला गेली असे कळल्यावर कुटुंबीयांनी तलावाकडे धाव घेतली असता त्याठिकाणी दोन मुलांचे कपडे आढळले, त्यावेळी रात्रीचे 8 वाजले होते.
घटनेची माहिती मिळताच गोंडपीपरी चे ठाणेदार रमेश हत्तीगोटे आपल्या चमुसह तलावाजवळ दाखल झाले, मुलांचा शोध घेण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आले, मात्र रात्र झाल्याने शोध मोहीम थांबली.
Chandrapur news today 14 वर्षीय गौरव विलास ठाकूर व 15 वर्षीय शौर्य भास्कर पिंपळशेंडे राहणार शिवाजी चौक असे तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहे.
आपली मुले तलावात बुडाली असे समजताच कुटुंबातील सदस्यांनी टाहो फोडला, सकाळी पुन्हा शोधमोहिमेला सुरुवात केल्यावर दोन्ही मुलांचे मृतदेह शोध पथकाच्या हाती लागले.