Chandrapur police station चंद्रपुरातील अंचलेश्वर प्रभागात राहणाऱ्या नकवे कुटुंबातील 13 वर्षीय मतिमंद मुलगा रोहन कुमार नकवे हा 9 मे पासून घरून बेपत्ता झाला आहे.
अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
रोहन सकाळी 6 वाजता सायकल सोबत घेत खेळायला बाहेर निघून गेला होता, रोहन ची आई कविता अविनाश नकवे ह्या ज्यावेळी घरी आला तेव्हा रोहन हा घरी दिसला नाही, त्यांनी इतरत्र मुलाचा शोध घेतला मात्र रोहन कुठेही आढळून आला नाही.
पर्यटकानो अवश्य वाचा : जंगल सफारी करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना अतिउत्साहीपणा महागात पडला
Chandrapur police station 10 मे रोजी कविता नकवे यांनी शहर पोलीस ठाण्यात मुलाला कुणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळविले अशी शक्यता वर्तवित तक्रार दाखल केली.
रोहन ने घराबाहेर पडताना अंगात लाल रंगाची टी शर्ट, काळ्या रंगाचा नाईट पॅन्ट, पायात स्लीपर चप्पल व सोबत लाल रंगांची सायकल घेऊन तो बाहेर खेळत होता.
Chandrapur police station शहर पोलिसांनी नागरिकांना सदर वर्णनाचा मुलगा कुठेही आढळून आला तर तात्काळ शहर पोलीस स्टेशन चंद्रपूर मधील सहायक पोलिस निरीक्षक राहुल गुहे, पोलीस उपनिरीक्षक विजय मुक्के मोबाईल क्रमांक – 7720036111, 9923401065 वर सम्पर्क साधण्याचे आवाहन केले आहे.