Chandrapur tobacco smuggler चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अवैध धंद्यावर अंकुश आणावे यासाठी आदेश दिले आहे.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशाची अंमलबजावणी करताना पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी विविध पथके नेमत जिल्ह्यातील अवैध धंद्यावर संक्रात आणण्याचे काम सुरू केले आहे. Chandrapur tobacco smuggler
30 एप्रिलला रात्री च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की बाबूपेठ येथे तंबाखू तस्कर हनुमान आंबटकर यांनी आपल्या घरी सुगंधित तंबाखूचा साठा विक्री साठी आणला आहे. Chandrapur tobacco smuggler
माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने हनुमान च्या घरी धाड मारीत त्याच्या घरून ईगल हुक्का, होला हुक्का, मजा सुगंधित तंबाखूचा साठा एकूण किंमत 3 लाख 89 हजार 870 रुपये जप्त केला.
हनुमान ची चौकशी केली असता त्याने सांगितले की हा माल रयतवारी कॉलरी येथील अमरदीप गुप्ता यांच्याकडून आणला आहे. Chandrapur tobacco smuggler
स्थानिक गुन्हे शाखेने हनुमान आंबटकर व अमर दीप गुप्ता यांच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, किशोर वैरागडे, रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवथरे यांनी केली.
कोण आहे हनुमान?
चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरात मराठा चौकात राहणारा हनुमान आंबटकर हा अनेक वर्षांपासून सुगंधित तंबाखू चा व्यवसाय करीत आहे, काही वर्षांपूर्वी शहर पोलिसांनी कारवाई केली होती, आता तंबाखू विकणे सहज व्हावे यासाठी हनुमान होलसेल किराणा दुकान टाकत त्याने पुन्हा व्यवसायाला भरारी देण्याचे काम केले, मराठा चौक व आता गन्नूरवार चौकात त्याने होलसेल चे दुकान थाटले आहे.
बाबूपेठ परिसरातील अनेक पान ठेला व्यवसायिकांना हनुमान सुगंधित तंबाखू पुरवतो, या तंबाखूचे खर्रा मार्फत अनेक युवकांना व्यसन जडले आहे, त्या व्यसनाचे रूपांतर आता कॅन्सर आजारात होत आहे, जिल्ह्यातील जयसुख, वसीम, गुप्ता आणि हनुमान हे सर्व व्यावसायिक काही पैश्यासाठी प्रतिबंधित तंबाखूचा व्यापार करीत भविष्यातील तरुण पिढीला कॅन्सर च्या खाईत ढकलण्याचे काम करीत आहे.
मात्र शहर पोलिसांच्या हद्दीत असलेल्या या माफियावर कठोर कारवाई का होत नाही? तंबाखू तस्करी करताना इतका साठा हनुमान आणत असतो तर त्याला आशीर्वाद कुणाचा आहे? हे सुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शोधायला हवं.