Chandrapur weather rain : चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे थैमान

Chandrapur weather rain चंद्रपूर – हवामान खात्याने 7 मे ते 14 मे पर्यंत चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे, हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत असून आज 9 मे रोजी दुपारी 12 वाजता ढगाळ वातावरणामुळे भर दुपारी काळोख पसरला.

 

वाघाचा हल्ला – वाघाच्या हल्ल्यात 7 वा बळी

अवघ्या काही वेळातच सोसाट्याचा वारा सुरू झाला, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

Chandrapur weather rain अर्धा तास पडलेल्या या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले, अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले, सावली येथे बाजारात अनेक दुकानाचे टिन उडाले, जिल्ह्यातील विविध तालुक्यात हीच परिस्थिती कायम होती.

 

Chandrapur weather rain चंद्रपूर शहरातील बिनबा गेट मार्गावर 1 ते दीड फूट पाणी रस्त्यावर साचले होते, या पाण्यातून अनेक नागरिक आपला मार्ग काढत पुढे जात होती.
सध्या जिल्ह्यात या मुसळधार पावसाने किती नुकसान झाले याबाबत सध्या माहिती मिळालेली नाही, घुटकाला प्रभागात रस्त्यावर मोठे वृक्ष कोसळले.

चंद्रपूर जिल्ह्यात आज अर्ध्या तासाच्या थैमानात 32 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!