Chat bot ideas नवीन वीज मीटर घ्यायचाय, वीज बिलाबाबत तक्रारी, विजबिल भरणा व तक्रारी जर ही सेवा आपल्याला एकाच ठिकाणी मिळाली तर, होय आता या सर्व सेवा आपल्याला एका क्लिक वर मिळणार आहे, महावितरण ने AI चा वापर करीत सदर सेवा सुरू केली आहे.
अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात 12 वी च्या परीक्षेच्या निकालात कल्याणी गुप्ता ने मारली बाजी
Chat bot ideas राज्यातील 3 कोटी वीज ग्राहकांना ही सेवा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करीत वीज ग्राहकांच्या मदतीसाठी संवादपर ऊर्जा चॅटबॉट ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
Chat bot ideas ग्राहकांना दोन भाषेचा पर्याय या चॅट बॉट मध्ये उपलब्ध असणार ज्यामध्ये इंग्रजी व मराठी भाषा उपलब्ध आहे, राज्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषी वीज ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर ही चॅट बॉट www.mahadiscom.in वर ऊर्जा चॅट चा वापर नागरिकांना करता येणार आहे.
अवश्य वाचा : RTE योजनेत नोंदणी प्रक्रियेला सुरुवात
नवीन वीज जोडणी, जोडणीसाठी केलेल्या अर्जाची सद्यस्थिति, वीजबिल भरणा, विजबिलाचा तपशील, मीटर वाचन, सबमिशन, मोबाईल क्रमांक नोंदणी, ऑनलाइन रकमेचा भरणा असे अनेक पर्याय यामध्ये उपलब्ध असून त्याबाबत ग्राहकांना या चॅट बॉट सेवेचा लाभ घेता येणार आहे.
Chat bot ideas यामध्ये तक्रार करण्यासाठी 24 तास सुरू असलेले टोल फ्री क्रमांक, एसएमएस क्रमांक, ईमेल, मिस्ड कॉल सेवा आदींची सेवा या ऊर्जा चॅट बॉट द्वारे ग्राहकांना मिळणार आहे. ही सेवा मार्च महिन्यापासून ग्राहकांसाठी सुरू करण्यात आली असून आतापर्यंत हजारो नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.