Chor BT Cotton Seeds कृषी विभागाच्या भरारी पथकाने चंद्रपूर जिल्ह्यात मोठी कारवाई करीत तब्बल 79 लाख 60 हजारांचे चोर बीटी कापूस बियाणे जप्त केले आहे.
अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील या शेतकऱ्यांने तब्बल 3 दिवस वाघाचे तुकडे केले
चंद्रपूर जिल्ह्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करीत लाखोंचे चोर बीटी बियाणे पकडले आहे.
पहिल्या कारवाईत 15 मे रोजी रात्रीच्या सुमारास मौजा नवेगाव तालुका पोम्भूर्णा येथे गुप्त माहितीच्या आधारे संशयास्पद पक्क्या घरात धाड मारीत त्याठिकाणी चोर बीटी कापूस बियाणे एकूण 80.30 किलोग्राम किंमत एकूण 2 लाख तीन हजार सहाशे चाळीस रुपयांचे जप्त करण्यात आले.
अवश्य वाचा : पावसात पडणाऱ्या विजेपासून असा करा स्वतःचा बचाव
Chor BT Cotton Seeds दुसऱ्या कारवाईत 16 मे रोजी रात्री मौजा भीमनी येथे गुप्त माहितीच्या आधारे नीलकंठ गिरसावळे यांच्या शेतातील घरात चोर बीटी कापूस बियाणे एकूण 39.88 क्विंटल एकूण किंमत 76.57 लाख रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई 17 मे पहाटे पर्यंत सुरूच होती.
दोन्ही कारवाई मध्ये एकूण 79 लाख 60 हजार सहाशे चाळीस रुपयांचे चोर बीटी कापूस बियाणे जप्त करण्यात आले, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, चंद्रशेखर कोल्हे, लकेश कटरे, श्रावण बोढे, महेंद्र डाखरे, विवेक उमरे, चंद्रकांत निमोड, जुमनाके आदींनी केली.