corruption complaint number 7 मे रोजी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई केली, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांच्यावर बिअर बार चालकाला नव्या परवान्यासाठी तब्बल 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.
corruption complaint number चेतन खारोडे व अभय खताळ यांना 10 मे पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे, मात्र संजय पाटील हे अद्यापही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले नाही, त्यांच्या मागावर सध्या पोलीस पथक लागले आहे.
corruption complaint number लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरच्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांनी जर शासकीय कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने आपल्याला लाच मागत असेल तर आम्हाला सम्पर्क करा, 1064 या टोल फ्री क्रमांकावर आपण कॉल करू शकता. असे आवाहन भोसले यांनी यावेळी केले.