गुरू गुरनुले
Department of Water Conservation मुल – मुल तालुका हा धान उत्पादन करणारा तालुका आहे.परंतु शेतीच्या विकासासाठी पुरेशा प्रमाणात सिंचनाची सोय झालेली नाही. चिखली – मोरवाही भागात गोसेखुर्द धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण झाले नसल्याने या साझातील राजोली, डोंगरगाव, मुरमांडी,गोलाभुज, गांगलवाडी, बेलगाटा, चीतेगाव, गोलाभुज, मोरवाही, राजोली, इत्यादी गावे सिंचन सोई पासून वंचित आहेत. यासाठी अप्पर जिल्हाधिकारी श्री. देशपांडे व जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रीमती, नीलिमा मंडपे यांचेकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
चिखली – मोरवाही परिसरातील शेतकरी बांधवांनी गावाला लागूनच वाहणाऱ्या उमा नदीवर बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी यापूर्वीच करण्यात आली होती. शेतकऱ्यांची महत्वाची मागणी लक्षात घेऊन शासनाकडे ही मागणी मंजूर करुन चिखली घाटावर एक बंधारा व मोरवाही घाटावर एक बंधारा मंजूर करण्यात आला.
अवश्य वाचा : चंद्रपुरात अतिक्रमण हटाव मोहिमेचा निषेध
Department of Water Conservation हे काम मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने १५ कोटी रुपये खर्चाची निविदाही काढण्यात आली होती. या कामाचे कार्यारंभ आदेशही मे २०२३ लाच कंत्राटदार सहदेव कन्स्ट्रक्शन कंपनी नागपूर यांना देण्यात आले होते. तरी देखील कंत्राटदाराने काम सुरू केले नाही. जर कार्यारंभ आदेश प्राप्त होताच सहदेव कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली असती तर चिखली व मोरवाही बंधाऱ्याच्या पाण्याने हजारो हेक्टर जमिनीला याचा फायदा झाला असता व शेतकऱ्यांना धानाचे उत्पन्न उत्तम झाले असते.
अवश्य वाचा : पाण्यासाठी नागरिकांनी केले रस्ता रोको आंदोलन
Department of Water Conservation परंतु बंधाऱ्याचे काम कंत्राटदाराने सुरु केले नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाली आहे. पाण्याअभावी खरीप पिके गेलीच आणि यासोबत शेतकऱ्यांना रब्बीपिकेही उन्हाळी धान, गहू, चना,लाख, तूर,भाजीपाला, मका अशी पिके घेता आली नाही. त्यामुळे चिखली मोरवाही परिसरातील नऊ अनेक गावातील शेतकरी संकटात सापडले आहेत.
Department of Water Conservation मृद् व जलसंधारण विभागाने मजुरी दिलेल्या चिखली व मोरवाही बंधारा बांधकामाचे निविदा प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही कामाचे कार्यारंभ आदेश देऊनही जर कंत्राटदाराने बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात केली नाही. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले.याला जबाबदार सहदेव कांट्राक्षण कंपणी नागपूर असून अशा कंपनीचे परवाने तात्काळ रद्द करावे अशी मागणी निवेदनातून तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, चिखली सरपंच नंदू नैताम,माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लहू कडस्कर व उपसरपंच दुर्वास कडस्कर, मोरवाही सरपंच अनुराधा नेवारे, सदस्य प्रभाकर गेडाम, मधुकर कडस्कर, व शेतकरी बांधव यांनी केली असून शासनाने व मृद्द व जलसंधारण विभागाने संबंधित कंत्राटदाराला त्वरित काम सुरु करण्याची तंबी द्यावी अन्यथा चिखली व मोरवाही येथील शेतकरी रस्त्यावर उतरून जनआंदोलन करण्यात येईल. असा इशाराही निवेदणामधून दिला आहे.
याप्रसंगी सिंचन अभावी शेतकऱ्यांची नापिकी झाली आणि शेतकरी आत्महत्या केल्या तर याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची राहील असेही जिल्हा जलसंधारण अधिकारी यांचेकडे बोलून दाखविले आहे.