Disaster Management plan : मूल नगरपरिषदेने सुरू केली मान्सूनपूर्व सफाई

गुरू गुरनुले

Disaster Management planमु ल – यावर्षीचा पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपला आहे. यंदा मान्सून लवकरच बरसणार व सरासरीपेक्षा १०६ टक्के पाणी पडण्याची शक्यता लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने गत पाच दिवसाआधी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, प्रशासक याची सभा घेऊन त्वरीत नियोजन करण्याच्या सुचना देऊन विषय गंभीरपणे हाताळण्याच्या सुचना दिल्यात.

अवश्य वाचा : चंद्रपुरातील दारू विक्रेत्यांना प्रशासनाने पाजले कायद्याचे डोज

Disaster Management plan बरेचदा मान्सूनपूर्व नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी सभा घेतात.इकडे अधिकारी सभा घेऊन खालच्यांना कामाला लावण्याचा कागदोपत्री पुरावा ठेवतात. शेवटी पाणी वाहून गेल्यावर पार बांधण्याची परंपरा मूल न.प. प्रशासनाने यंदा मात्र तोडल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. हा एक “आपत्ती व्यवस्थापणाचा” उत्तम दाखला असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट

हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेता मूल नगरपरिषद प्रशासन लगबगीने मान्सूनपूर्व तयारीला लागले आहे
हे स्पष्टपणे जाणवत आहे. मुल शहरातून धावणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासोबत धावणाऱ्या गटरलाईन ची सफाई हा विषय तेवढाच महत्वाचा व पावसाळ्यातील अडगळ थाबविणारा विषय गंभीरपणे लक्षात घेऊन गत तिन दिवसापासून संपुर्ण अस्वच्छता यंत्रणा मलबा काढण्यात व्यस्त झाली आहे. या गटर लाईनची सफाई युद्धस्तरावर सुरू केली आहे.ही गटरलाईन साफ व्हायला आठवडा लागेल हे विशेष. या मोठया गटरलाईनला आजवर दुर्लक्षीत ठेवण्यात आले होते.व याचा मोठा फटका अनेकदा निवासी घरांना बसला आहे.

 

Disaster Management plan मूल शहरातून महामार्गासोबत धावणारी हीगटरलाईन अंदाजे एक चतुर्थांस माती व सडका केरकचऱ्याने भरलेली होती. या गटरलाईन मधून संपुर्ण शहरातील सांडपाण्याचा निचरा तलावांमध्ये होतो. पावसाळ्यातील शहराच्या चहूबाजूने येणाऱ्या पावसाच्या पाण्याला सामावून घेण्याचे महत्वाचे काम ही गटरलाईन करते. आधीच ही गटरलाईन पावसाचे पाणी वाहून नेण्यास तांत्रिकदृष्टया सक्षम नसल्याची ओरड होती. अशा स्थितीत गटरलाईन तुडूंब भरून जोडलेल्या नाल्यांचे पाणी थोपून शहरातील मोठया परिसरात पसरण्याची असलेली भिती न.प. आपत्ती व्यवस्थापणाने राहणार नाही. असे बोलले जाते.

अवश्य वाचा : वरोरा नाका चौकात होणार बदल

मागील सन २०२०, व २०२१ मध्ये शहरातील शेकडो घरांमध्ये घाण पाणी घुसून जिवघेणी स्थिती निर्माण झाली होती. ही तालुका व जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष अनुभवली होती. अखेर शहराबाहेरून वनविकास महामंडळाचे क्षेत्रातून भरमसाठ अतिरीक्त पाणी अर्धा कि.मी. नाला काढून परस्पर बाहेर काढावे लागले होते. चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या आपत्ती व्यवस्थापण सभेनंतर लगेच शहरात येणारा पाण्याचा अधिकाधिक लोंढा जंगलात वळविण्याकरीता वनविभागाकडे अजून लगेच नवा प्रस्ताव टाकण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.व न.प.वप्रशासान अधिकारी याकडे जातीने लक्ष देत आहेत.

 

Disaster Management plan मूल शहरात घुसणाऱ्या पाण्याचा मोठा लोंढा थांबविण्यासाठी महत्वाचा ठरलेल्या नाल्याची साफसफाई व खोलीकरणाचे कामही जेसिबी लावून सुरू करण्यात आले आहे हे विशेष.

मूल न.प. अंतर्गत ५८ सफाई कामगार, जेसिबी,सारे ट्रॅक्टर्स स्वच्छता व आरोग्य निरीक्षक अभय चेपूरवार, सहायक वसंत मोहूलै यांच्या मार्गदर्शनात आपत्ती व्यवस्थापण कार्यात पूर्णवेंळ व्यस्त झाल्याचेचित्र दिसून येत आहे. न.प.मुख्याधिकारी यशवंत पवार, प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यावर मार्गदर्शन व देखरेख करित आहेत.जनचरचे नुसार मूल न.प. ने त्वरीत कामे सुरू करून आपत्ती व्यवस्थापणाचा उत्तम दाखला यातून दिला हे निश्चित.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!