ear tag applicator : 1 जूनपासून पशुधनाची खरेदी-विक्री होणार बंद

ear tag applicator राज्यातील सर्व पशुंना टॅगिंग करून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेणे बंधनकारक करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतक-यांकडे असलेल्या सर्व पशुधनाच्या कानात इअर टॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक आहे.

अवश्य वाचा : कुणी लाच मागताय, तर आम्हाला कॉल करा

ear tag applicator तसेच दिनांक 1 जून 2024 नंतर इअर टॅगिंग शिवाय पशुधनाची खरेदी व विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय खरेदी विक्री करता येणार नाही. तसेच पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा दिली जाणार नाही.

सविस्तर बातमी – चंद्रपुरात आता मद्य घोटाळा फाईल्स

आणि नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्यप्राण्याचा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नाही. तसेच पशुधनाची वाहतूक इअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही. जर केल्यास कार्यवाहीसाठी समोर जावे लागेल.

इअर टॅगिंग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावागावातील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे इअर टॅगिंग नसलेले पशुधन बाजार समिती मध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी विक्री होणार नाही.असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मंगेश काळे यांनी सांगितले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!